महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साई फार्म, सिडीएम गेम संघ विजयी

09:52 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुबळी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित हुबळी प्रिमियर लीग 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सीडीएम गेम संघाने झेवर गॅलरी बेळगाव संघाचा 8 गड्यांनी तर साई फार्म संघाने रॉयल चॅलेंजर हुबळी संघाचा 6 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. अतिथ भोगण व अभिषेक शिवशिंपेगर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात झेवर गॅलरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 21.4 षटकात सर्वगडी बाद 53 धावा केल्या. त्यात परशुराम व अवनीश यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. सीडीएम गेम संघातर्फे अभिषेक शिवशिंपेगरने 18 धावात 4 तर नोमान के 2 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीडीएम संघाने 15 षटकात 2 गडी बाद 54 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सुप्रितने 3 चौकारासह 17, शुभमने 2 चौकारासह 13 तर अभिषेक व पृथ्वी यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे महंमद हमजाने 18 धावात 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात यशवंत के ने 3 चौकारासह 40, पृथ्वीराजने 2 चौकारासह 29, प्रितमने 2 चौकारासह 19 तर सुप्रेसने 2 चौकारासह 12 धावा केल्या. साईतर्फे अतिथ भोगणने 24 धावात 5 तर मीर व सुमीत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लबने 22.5 षटकात 4 गडी बाद 124 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात विहीर मिरजीने 5 चौकारासह 47, सिद्धांत करडीने 6 चौकारासह 40, सुमीत केलगिरीने 13 धावा केल्या. हुबळीतर्फे प्रितम गौरने 2, सुप्रेस व लक्ष्य यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article