सह्याद्रीनगर प्रभाग नऊमध्ये सर्वाधिक २८ हजार २६८ लोकसंख्या
सांगली :
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा बुधवारी प्रसिध्द झाला. निवडणूकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. या लोकसंख्येनुसार महापालिका क्षेत्रातील वीसपैकी सांगलीतील सहयाद्रीनगर येथील प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक २८ हजार २६८ लोकसंख्येचा प्रभाग झाला आहे. तर सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक १३ हा १६ हजार ९५३ इतकी सर्वात कमी लोकसंख्या असणारा प्रभाग बनला आहे. पालिका निवडणूकीसाठी सरासरी २५ हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे.
सन २०१८ सालच्या निवडणुकीप्रमाणेच २० प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांचीही लोकसंख्याही निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार २० प्रभागासाठी सरास-री २५ हजार लोकसंख्येचे प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यात कुपवाडमधील प्रभाग क्रमांक एक प्रकाशनगरमध्ये २८ हजार ५६, कुपवाड गावठाण प्रभाग क्रमांक दोनमध्ये २५हजार ३५, मिरजेतील मिशन हॉस्पिटल प्रभाग क्रमांक तीनमध्ये २७हजार ३७५, मिरजेतील ब्राह्मणपुरी प्रभाग क्रमांक चारमध्ये २६ हजार ८७९, मिरज किल्लाभाग प्रभाग क्रमांक पाचमध्ये २५ हजार ८८३, मिरज मिरासाहेब दर्गा प्रभाग क्रमांक सहामध्ये २४ हजार २८७, मिरज किल्लाभाग प्रभाग क्रमांक सातमध्ये २४ हजार १०५, सांगलीतील सहयाद्रीनगर प्रभाग क्रमांक नऊमध्ये २८ हजार २६८, सांगली टिंबर एरिया प्रभाग क्रमांक दहामध्ये २५ हजार ७८१, सांगली चिंतामणीनगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये २३ हजार ३७५, सा-'गली कर्नाळ रोड प्रभाग क्रमांक १२ मध्ये २५ हजार ५९८, सांगलीवाडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये १६ हजार ९५३, सांगली गावभाग प्रभाग क्रमांक १४ मध्ये २७ हजार ६४९, सांगली गणेशनगर प्रभाग क्रमांक १५ मध्ये २४ हजार ४२७, सांगली खणभाग प्रभाग क्रमांक १६ मध्ये २७ हजार ३४८, सांगली महावीरनगर प्रभाग क्रमांक १७मध्ये २४ हजार ९३८, सांगली शामरावनगर प्रभाग क्रमांक १८ मध्ये २७ हजार १३६, सांगली गर्व्हमेंट कॉलनी प्रभाग क्रमांक १९ मध्ये २४ हजार १८२, तर मिरज उत्तमनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये १९ हजार ९२१ इतकी लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे.