सह्याद्री फाउंडेशनतर्फे मान्सून महोत्सवाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सह्याद्री फाउंडेशन तर्फे यंदा 18 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान महिनाभर मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम तसेच स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असा निर्णय सह्याद्री फाउंडेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सह्याद्री फाउंडेशनची बैठक माडखोल येथील सावंत फार्म हाऊस मध्ये संपन्न झाली . यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, अध्यक्ष रवींद्र मडगावकर,सचिव प्रताप परब,ॲड संतोष सावंत ,प्रल्हाद तावडे ,सुहास सावंत, अशोक सांगेलकर,प्रमोद सावंत , सुनील खानोलकर,समीर पालव आदी उपस्थित होते. यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामात मान्सून महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. महिन्याभर चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील आठ दहा दिवसात निश्चित केली जाणार आहे असे बैठकीत नियोजन करण्यात आले .