सह्याद्री एक्स्प्रेस मार्चनंतरच होणार सुरू
कोल्हापूर :
मुंबई रेल्वे स्टेशन येथील दोन प्लॅटफॉर्मची कामे अद्यपी पूर्ण झालेले नाहीत. मुंबईत प्रवाशांची संख्या जास्त आणि रेल्वेच्या फेऱ्याही जास्त होत असतात. यामुळे प्लॅटफॉर्मच्या कामासाठी जास्त वेळ मेघाब्लॉक घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अपेक्षित गतीने काम होत नाही. मार्चपर्यंत ही कामे पूर्ण होतील. यानंतरच सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावू शकेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे.
कोल्हापुरातील अनेकजण कामानिमित्त व्यवसाय निमित्त मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीही मुंबईत जातात. तसेच नातेवाईक असल्यानेही काहीजण वारंवार मुंबई-कोल्हापूर किंवा कोल्हापूर-मुंबई प्रवास करतात. कोल्हापुरमध्ये साडेतीन शक्तीपीठापैएक एक असणारे अंबाबाई मंदिर आहे. याच्या दर्शनासाठीही भाविक मोठया संख्येने मुंबईहून कोल्हापूरला येतात. असे असतानाच एसटीकडे बसची संख्या कमी असल्याने सध्या या मार्गावर एसटीच्या बसची संख्या पुरेसी नाही. कमी खर्चात आणि त्रास विरहीत प्रवास असल्याने प्रवासी रेल्वेला प्रधान्य देतात. सह्याद्री एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या नेहमी फुल्ल असतात. परंतू गेल्या काही महिन्यांपासून मुंबई रेल्वे स्टेशनमधील दोन प्लॅटफॉर्मवर कामे सुरू आहेत. त्यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस बंद केली आहे. सध्या सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावत आहे. यामुळे या रेल्वेतून कोल्हापुरातून मुंबईला जाणारे तसेच मुंबईतून कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. याचा फायदा खासगी ट्रव्हलर्स कंपनी घेत आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये 800 रूपय असणारे तिकीट तब्बल 2 हजार करण्यात आले. प्रवाशांना वेळेवर जावे लागत असल्याने बहुतांशी प्रवाशांनी जादा दराने तिकीट घेतले. यानंतर सह्याद्री एक्स्प्रेसचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. प्रवाशी संघटनेने नुकतेच मुंबईत जाऊन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे तत्काळ सह्याद्री एक्स्प्रेस मुंबई पर्यंत सुरू करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. परंतू तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही. मुंबईतील दोन प्लॅटफॉर्मचे संपूर्ण कामे झालेली नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू केलेली नाही. आणखीन काही दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. मार्चनंतरच सह्याद्री एक्स्प्रेसला पुन्हा मुहूर्त मिळले, अशी अपेक्षा आहे.
दुहेरीकरण पूर्ण झाले नसल्याचाही फटका
मिरज ते पुणे रेल्वेच्या तीन स्टेशनवरील दुहेरीकरणाचे काम अद्यपी अपूर्ण आहे. रहमतपूर, तारगांव आणि कोरेगांव या स्टेशनचा समावेश आहे. येथील दुहेरीकरण झाल्यास सह्याद्री एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावण्यासाठी अडथळा येणार नाही. ही कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहेत. यानंतर कोल्हापूरातून मुंबईचा प्रवासातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच जलद गतीने प्रवास शक्य होणार आहे.