For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सह्याद्री एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार; पुणे-कोल्हापूर प्रवाशांना दिलासा

01:46 PM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सह्याद्री एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार  पुणे कोल्हापूर प्रवाशांना दिलासा
Advertisement
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : पुणे आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांच्या पसंतीची सह्याद्री एक्सप्रेस आता विशेष गाडीऐवजी नियमित दैनिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर या गाडीला नियमित क्रमांक देण्यात आला असून, मंगळवारपासून ती नव्या क्रमांकाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी विशेष गाडी म्हणून धावणारी ही एक्सप्रेस आता 11419 (पुणे-कोल्हापूर) आणि 11420 (कोल्हापूर-पुणे) या नियमित क्रमांकांनी ओळखली जाणार आहे. या निर्णयामुळे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त दोन्ही शहरांदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

18 आधुनिक एलएचबी डबे

प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसला 18 आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे. नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे.

पुणे-कोल्हापूर गाडीचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 11419 — पुणे ते कोल्हापूर

Advertisement

  • पुणे येथून दररोज रात्री 1.40 वाजता प्रस्थान.
  • कोल्हापूर येथे सकाळी 5.08 वाजता आगमन.

गाडी क्रमांक 11420  — कोल्हापूर ते पुणे

  • कोल्हापूर येथून दररोज रात्री 9.50 वाजता प्रस्थान.
  • पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 5.10 वाजता आगमन.

मार्गावर 20 प्रमुख थांबे

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला मार्गावरील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये सासवड, जेजुरी, मिरज, लोणंद, बाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कराड, टाकळी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी आणि रुकडी परिसरातील अन्य स्थानकांचा समावेश असल्याचे वृत्तात नमूद आहे.

पुणे आणि कोल्हापूर ही दोन महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या या गाडीचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि इतर प्रवाशांना होणार आहे. विशेष गाडीचा दर्जा संपवून नियमित सेवा सुरू करण्याच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

Advertisement
Tags :

.