साहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण उत्साहात; संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा
कोल्हापूर प्रतिनिधी
‘राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र सेवा दल’या पुस्तकाला करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगेमहाराज अध्यासनाच्या वतीने सन 2023 साठी संशोधन विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद यांच्या वतीने विविध पुरस्कार वितरण सोहळा शिवाजी विद्यापीठातील भाषाभवन येथे पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते. प्राचार्य रा. तु. भगत जीवनगौरव पुरस्कार भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना आणि संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना प्रदान करण्यात आला. करवीर साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सरोज बिडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. एम. बी. शेख, संत गाडगेबाबा अध्यासन अध्यक्ष एस एन. पाटील, करवीर साहित्य परिषद कोषाध्यक्ष एम. डी. देसाई, मिनल राजहंस, डॉ. कपिल राजहंस, डॉ. रोहित कोळेकर, ऋतुराज माने, डॉ. चांगदेव बंडगर, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.