महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारत सासणे, देविदास सौदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

06:15 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोकणी’साठी अद्वैत साळगावकर आणि हर्षा सद्गुरू शेट्यो यांचा गौरव

Advertisement

प्रतिनिधी/ पुणे

Advertisement

ज्येष्ठ कथाकार तसेच माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भुतबंगला’ या बाल कादंबरीला तसेच तुळजापूर येथील लेखक देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ या कादंबरीला सन 2024 चा युवा साहित्य अकादमी जाहीर झाला आहे. तसेच युवा विभागात कोकणीसाठी अद्वैत साळगावकर तर कन्नडसाठी श्रुती बी. आर. यांचाही विजेत्यांमध्ये समावेश आहे. तर बाल साहित्य विभागातून कृष्णमूर्ती बिळिगेरे (कन्नड) आणि हर्षा सद्गुरू शेट्यो (कोंकणी) यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या असलेल्या साहित्य अकादमीच्या 2024च्या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 23 सदस्यांच्या संमतीनंतर या पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये मराठी, नेपाळीसह 24 भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठीतील बालसाहित्य विभागासाठी राजीव तांबे, विनोद शिरसाट, विजय नगर, तर युवा विभागासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उमरीकर हे परीक्षक होते. रोख 50 हजार ऊपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 10 कवितासंग्रह, सात लघुकथा संग्रह, दोन लेख आणि एक निबंध, एक कादंबरी, एक गझल आणि एक संस्मरण अशा एकूण 10 पुस्तकांसाठी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ कथाकार तसेच माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी दीर्घ कथांसह किशोर व कुमारांसाठी मोठ्या प्रमाणात कथा व कादंबरी लिहिल्या आहेत. राज्य शासनाने सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे.

उदगीर येथे 2022 मध्ये पार पडलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्यो आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्र्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. भारत सासणे यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘काळोखाच्या पारंब्या’ या नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, आतंक, आयुष्याची छोटी गोष्ट, ऐसा दुस्तर संसार, चल रे भोपळ्या, चिरदाह, जंगलातील दूरचा प्रवास, जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह) त्वचा, दाट काळा पाऊस, दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा, सटवाईचा लेख, स्यमंतक मण्याचे प्रकरण, क्षितिजावरची रात्र आदी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. 5व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाचे अध्यक्ष, 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष् पद सासणे यांनी भूषविले आहे.

देविदास सौदागर यांची संपदा

देविदास सौदागर यांची उसवण ही कादंबरी 2022 मध्ये देशमुख आणि कंपनी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. सौदागर अठरा वर्षांपासून शिवणकाम करतात. उसवण ही त्यांची पहिली कादंबरी आहे. यापूर्वी त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुक्त विद्यापीठातून इतिहास या विषयात त्यांनी एम.ए. केले आहे.

आनंद अवर्णनीय....

साहित्य अकादमीचा पुरस्कार बाल विभागातून मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षे मी बालसाहित्य लिहित आहे. या कादंबरीतील पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. कुमार व किशोर मुलांसाठी विशेष पात्र निर्माण करावे, अशी इच्छा होती. निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून किशोर व कुमारवयीन मुलांना बुद्धीचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न मी ‘समशेर आणि भुतबंगला’ कादंबरीतून केला आहे. या कादंबरीतील हे पात्र रूजले आहे, याचाही आनंद आहे. या कादंबरीतील काही भाग साधनेच्या अंकात प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे साधना अंकासाठीच काही भाग लिहिले आहेत.

- भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक

पुरस्कारामुळे कष्टाची नोंद...

काळानुरूप तयार कपड्यांची मागणी वाढल्याने आता कापड विकत घेऊन कपढे शिवण्याची पद्धत मागे पडली आहे. पारंपरिक शिवणकाम बंद होऊ लागले आहे. पारंपरिक पद्धतीने शिवणकाम करणाऱ्या टेलरच्या उपासमारीची कहाणी या कादंबरीत मांडली आहे. यातील बरेचसे अनुभव व्यक्तीगत आहेत. काम कमी झाल्याने आम्हाला दुकान बंद करावे लागले. वडील आणि मी घरातून हे काम करतो. आजवरच्या जगण्याची आणि कष्टाची नोंद या पुरस्काराने झाली आहे.

- देविदास सौदागर, लेखक

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article