For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' ला साहित्य अकादमी पुरस्कार

11:02 AM Dec 21, 2023 IST | Kalyani Amanagi
कृष्णात खोत यांच्या  रिंगाण  ला साहित्य अकादमी पुरस्कार
Advertisement

उत्रे प्रतिनिधी

Advertisement

पन्हाळा तालुक्यातील उत्रे पैकी निकमवाडी येथील सिद्धहस्त लेखक प्राध्यापक कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे."रिंगण" या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचे वास्तव चित्रण सरांनी केले आहे.

गावठाणकार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या कृष्णात खोत सर यांनी २००८ साली "रिंगाण" ही कादंबरी लिहिली.या कादंबरीचे कन्नड भाषेत भाषांतर झाले असून या कादंबरीवर एम फिल सुद्धा केलं जातं आहे.रिंगाण कादंबरीच्या अल्पावधीतच तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. रिंगाण " या कादंबरी पूर्वी सरांच्या 'गावठाण',' रौदाळ', 'झड-झिंबाड' , 'धूळमाती' या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

Advertisement

रिंगाण या कादंबरीचा नायक ही कुणी व्यक्ती नसून "खेडेगाव कादंबरीचे नायक आहे".मराठी साहित्यात व्यक्तीला नायक न बनवता गावालाच नायक बनवून सरांनी आगळं वेगळं साहित्याचा मानदंड समाजासमोर आणला आहे.या निमित्ताने ग्रामीण साहित्याला वेगळी दिशा दिली आहे. 'रिंगण' ही कांदबरी खेडुतांच्या राजकारणाचा वेध घेणारी मराठी आणि ग्रामीण भागातील अव्वल कादंबरी आहे.ग्रामीण राजकारणावर थेट भाष्य करणारी कादंबरी आहे.

राजकारण हा अलिकडे गावाचा केंद्रबिंदू झाला असून राजकारणातील अचूक बारकावे सरांनी कादंबरीत टिपले आहेत.आधुनिकतेचे पेचप्रश्न ,विस्थापन ,माणूस आणि निसर्ग -प्राणी यांच्यातील संघर्षाची प्रभावी व वास्तववादी मांडणी सरांनी केली आहे. गावातील लहानमोठ्या प्रसंगाचे ,व्यक्तींचे विशेष कल्पनेने लिहिणारे खूप आहेत,पण प्रत्यक्षात आजूबाजूला घडलेले प्रसंग स्वतः पाहिले असल्याने कादंबरी जिवंत होते. रिंगण" वाचत असताना शब्दांच्या ताकदीमुळे घटना वा प्रसंग समोर घडत असल्याचा जणू भास होतो.

सर, शब्दप्रभू आहेत. अनेक कादंबऱ्यांचे सिद्धहस्त लेखक असणारे कृष्णात सरांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कृष्णा खोत यांना आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्हा त व सर्व त्र त्यांचे कौतुक होत आहे. आचार,विचार व संस्कार यामुळे सरांच्यात माणुसपण ठासून भरले आहे. सच्चा मित्र,सोबती , समर्थ सहकारी व हाडाचा व संवेदनशील प्राध्यापक ही सरांची ओळख आहे.

प्राध्यापक कृष्णात खोत सरांच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा एक स्वल्पविराम ठरु द्या. यांसारखे अनेक अनेक पुरस्कार सरांच्या कादंबरीस मिळाल्यावर मग पूर्णविराम मिळू दे अशी अपेक्षा निकमवाडी, उत्रे पन्हाळा तालुक्यातील जनतेतून होत आहे.

Advertisement
Tags :

.