For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’

07:35 PM Dec 20, 2023 IST | Abhijeet Khandekar
कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’
Krishnat Khot Ringan
Advertisement

कोकणीसाठी प्रकाश पर्यकरांच्या ‘वर्सल’चाही सन्मान

पुणे / प्रतिनिधी

साहित्य विश्वातील प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. मराठीमध्ये कोल्हापूरातील कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या विस्थापितांचे चित्रण करणाऱ्या ‘रिंगाण’ या कादंबरीला, तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला यंदाचा ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासराव यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

Advertisement

‘साहित्य अकादमी’कडून देशातील 24 भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा हिंदीतील ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ संजीव यांना त्यांच्या ‘मुझे पाहानो’ या कादंबरीसाठी देण्यात आला आहे. तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण 12 मार्चला दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. एक लाख ऊपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वऊप आहे.

‘रिंगाण’ मध्ये विस्थापितांचे चित्रण
कृष्णात खोत यांनी ‘रिंगाण’ या कादंबरीत मध्ये विस्थापितांच्या जगण्याचे अत्यंत भेदक चित्रण केल्sढ आहे. ‘रिंगाण’ ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झाली होती. कृष्णात खोत यांच्या यापूर्वी ‘गावठाण’ (2005), ‘रौंदाळा’ (2008), ‘झड-झिंबड’ (2012), ‘धूळमाती’ (2014) या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर ‘नांगरल्याविन भुई’ (2017) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.