For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरा जलतरण स्पर्धेसाठी साहिल, सुमित इटलीला रवाना

09:48 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॅरा जलतरण स्पर्धेसाठी साहिल  सुमित इटलीला रवाना
Advertisement

बेळगाव : इटलीतील सभी डोरा शहरात होणाऱ्या सिटी पॅरा विश्व जलतरण स्पर्धेसाठी बेळगावच्या साहिल जाधव व सुमित मुदगेकर यांची भारतीय संघात निवड झाली असून सिटी विश्व जलतरण स्पर्धेसाठी इटलीला रवाना झाले आहेत. इटली येथे 11 ते 17 मार्च दरम्यान होणाऱ्या सिटी पॅरा विश्व जलतरण स्पर्धेसाठी भारतीय पॅरा जलतरण संघात बेळगावचे साहिल जाधव व सुमित मुदगेकर निवड झाली आहे. या स्पर्धेत साहिल राजेंद्र जाधव एस 9, एसबी 8 व एसएम 9 या विभागात 50 मी. बटरफ्लाय, 100 मी. बटरफ्लाय, 100 मी. फ्रीस्टाईल, 200 मी. वैयक्तिक मिडले या प्रकारात भाग घेणार आहे. तर सुमित मुदगेकर एस 9, एसबी 8, एसएम 9 या विभागात 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 100 मी. फ्रीस्टाइल, 200 मी. वैयक्तिक मिडले या प्रकारात भाग घेणार आहे. यापूर्वी साहिल व सुमित यांनी देशात घेण्यात आलेल्या विविध पॅरा जलतरण स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्याकडून जलतरणचे धडे गिरवले आहेत. जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कडूचकर, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. तर डॉ. प्रभाकर कोरे, जयंत हंबरवाडी, अविनाश पोतदार, राम मलिया, माखी कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर रोशन यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.