For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Crime | सहकारनगर हादरलं! शस्त्रांसह आलेल्या 18 जणांनी सोसायटीत घातला धुडगूस

04:08 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
pune crime   सहकारनगर हादरलं  शस्त्रांसह आलेल्या 18 जणांनी सोसायटीत घातला धुडगूस
Advertisement

पुणे : सहकारनगर परिसरातील मल्हार मार्तंड सोसायटीमध्ये मध्यरात्री टोळक्याने धुडगूस घालत चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्री घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement

याप्रकरणी निलेश उमेश मोहिते (वय ३८, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, सहकारनगर क्रमांक १, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास काही जण वेगवेगळ्या दुचाकींवरून सोसायटीत आले. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत आरडाओरडा केला. तसेच हातातील शस्त्रे उगारून परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या चार कारच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकींवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.