For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहजा यमलापल्लीचे आव्हान समाप्त

06:29 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहजा यमलापल्लीचे आव्हान समाप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

येथे सुरू असलेल्या मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेतील एकेरीत रुतुजा भोसले व सहजा यमलापल्ली यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले.

दोघीनाही तीन सेट्सच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पोटदुखीचा त्रास होत असतानाही अमेरिकेच्या आठव्या मानांकित केटी व्हॉलीनेट्सने कडवी लढत देत रुतुजा भोसलेचा 7-6 (10-8), 2-6, 6-1 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. व्हॉलीनेट्सने याआधी अंकिता रैनाचे आव्हानही संपुष्टात आणले होते. दुसऱ्या एका सामन्यात सहजा यमलापल्लीला रशियाच्या पोलिना कुडरमेटोव्हाने 1-6, 6-3, 7-5 असे हरवित आगेकूच केली. तिसऱ्या सेटमध्ये सहजाने 5-2 अशी भक्कम आघाडी घेतली होती आणि आपल्या सर्व्हिसवर गेम व सामना संपवण्याची सुवर्णसंधी होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.