सागर सिंग, सुरज अंतिम फेरीत
06:03 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
व्हिएतनाममध्ये शनिवारपासून सुरु झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या सागर सिंग आणि सूरज यांनी आपल्या वजन गटामध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुषांच्या 67 आणि 60 किलो वजन गटातील ग्रीको रोमन प्रकारात सागर सिंग आणि सूरज या दोन्ही भारतीय मल्लांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली आहे. 67 किलो गटात सागर सिंगने तर 60 किलो गटात सुरजने भारताची किमान दोन पदके निश्चित केली आहेत. 77 किलो गटात भारताचे रौप्यपदक निश्चित झाले आहे. कुमार सचिनला उपांत्य लढतीत डुरसोनोव्हकडून पराभव पत्करावा लागला. मात्र 72 आणि 82 किलो वजन गटात भारतीय मल्लांचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले.
Advertisement
Advertisement