For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमळे कौल सहकार संस्थेच्या संचालकपदी सागर नाणोसकर बिनविरोध

02:19 PM Jan 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नेमळे कौल सहकार संस्थेच्या संचालकपदी सागर नाणोसकर बिनविरोध
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

नेमळे येथील सहकारी कौल उत्पादक संस्थेच्या संचालकपदी सागर सोमकांत नाणोसकर यांची एकमताने निवड करण्यात आली.संस्थेचे माजी संचालक कै.विकास भाईसाहेब सावंत यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते.या रिक्त जागी कोणाची नियुक्ती करायची,यासाठी आज विशेष सभा बोलवण्यात आली होती.या सभेत नाणोसकर यांच्या नावावर सर्वानी शिक्कामोर्तब केले. या निवडीनंतर बोलताना सागर नाणोसकर यांनी सर्वाचे आभार मानले.संस्थेची भविष्यातील वाटचाल अधिक प्रगतीशील करण्यासाठी सर्व अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करु,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.त्यांच्या या निवडीबद्दल सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.