For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्यकर्त्याच्या रक्ताच्या चिञाने पहाडासारखे हसन मुश्रीफ झाले भावुक

04:02 PM Apr 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
कार्यकर्त्याच्या रक्ताच्या चिञाने पहाडासारखे हसन मुश्रीफ झाले भावुक
Hasan Mushrif
Advertisement

कागलच्या सागर दावणेकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अनोखी चित्रभेट

कागल / प्रतिनिधी

कागल येथील सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या रक्ताने साकारलेले चित्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांचे आपल्यावरील जिवापाड प्रेम पाहून पहाडासारखे असणारे मंत्री श्री. मुश्रीफही भावूक झाले.
कोल्हापूर जिह्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि सहकारात पालकमंत्री मुश्रीफ यांनी तब्बल 30 ते 35 वर्षे आपला दबदबा कायम राखला आहे. यामागील रहस्य म्हणजे त्यांचे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, असेच म्हणावे लागेल.

Advertisement

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात राहिलेले आहे. जीवाला जीव देणार्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच अनेक आव्हाने सहज पार करत आलो आहे. अशा सर्वच कार्यकर्त्यांचा मी नेहमीच ऋणी राहीन.
दरम्यान, सागर दावणे या कार्यकर्त्यांने आपल्या छातीवर आणि दंडावरही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या छायाचित्राचे गोंदण करून घेतलेले आहे. सागरने आपल्या घराला ठमुश्रीफ एके मुश्रीफठ असेच नामकरण केले आहे. तसेच, श्री. मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली त्यावेळी सागर दावणे यांने ईडीच्या अधिकार्यासमोर आपले डोके आपटून रक्तबंबाळ होत त्यांचा निषेध व्यक्त केला होता. यावेळी तो रक्तबंबाळ झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनीही ईडीबाबत संताप व्यक्त केला होता.

Advertisement

Advertisement

.