For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘सॅफ’ फुटबॉल : सलामीच्या सामन्यात आज भारत पाकशी भिडणार

06:22 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सॅफ’ फुटबॉल   सलामीच्या सामन्यात आज भारत पाकशी भिडणार
Advertisement

वृत्तसंस्था, ढाका : दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात केवळ 18 खेळाडू उपलब्ध असलेला भारताचा दुय्यम संघ आज गुऊवारी येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. भारत गतविजेता आहे, परंतु 12 आणि 15 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे ऑकलंड आणि ख्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविऊद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांमुळे मुख्य संघ या स्पर्धेत उतरलेला नाही.

Advertisement

तसेच इंडियन सुपर लीग (आयएसएल) क्लब्सची चालू हंगामाच्या मध्यास खेळाडूंना सोडण्यास असलेली अनिच्छा हा देखील एक मुद्दा आहे. कारण पाकिस्तानविऊद्धचा गुऊवारचा सामना हा ‘फिफा’च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कालावधीच्या (9 ते 17 नोव्हेंबर) बाहेर येत आहे. स्पर्धेसाठी संघाची घोषणा करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) सांगितले होते की, 18 खेळाडू 3 नोव्हेंबर रोजी कोलकाताहून ढाका येथे प्रवास करतील, तर उर्वरित 10 खेळाडू पुढील काही दिवसांत संघात सामील होतील.

9 नोव्हेंबर रोजी फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कालावधी सुरू झाल्यावर आयएसएल क्लब त्यांचे खेळाडू सोडतील आणि संघात 28 खेळाडू असतील. सहा संघांच्या या स्पर्धेत भारताचा पुढील सामना 11 नोव्हेंबर रोजी मालदीवविऊद्ध होणार असून हा गट ‘ब’मधील त्यांचा दुसरा सामना असेल, जो ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 17 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

Advertisement

भारतीय संघाची जबाबदारी 23 वर्षांखालील राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मुसा यांच्याकडे आहे. बिबियानो फर्नांडिस, ज्यांनी नुकतेच अझरबैजान येथे झालेल्या फिफा 15 वर्षांखालील विश्वचषकात भारताच्या 15 वर्षांखालील मुलांच्या संघाला प्रशिक्षण दिले होते, ते साहाय्यक प्रशिक्षक आहेत. 1993 पासून झालेल्या या स्पर्धेच्या 14 पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये भारताने ही प्रादेशिक स्पर्धा नऊ वेळा जिंकली आहे, तर चार वेळा उपविजेतेपद आणि एकदा तिसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानची सर्वोत्तम कामगिरी 1997 मध्ये मिळवलेले तिसरे स्थान ही आहे.

मागील कामगिरी पाहता पाकिस्तानविऊद्ध भारताचे वर्चस्व राहिले आहे. या सहस्रकाच्या सुऊवातीपासून दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांपैकी भारताने सात जिंकले, दोन गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना 2023 मध्ये बेंगळूर येथे झालेल्या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत पाहायला मिळाला होता. त्यात भारताने 4-0 ने विजय मिळवला होता, ज्यात सुनील छेत्रीने हॅट्ट्रिक केली होती. त्यानंतर इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती.

Advertisement
Tags :

.