For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे काळाची गरज : दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी

05:27 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे काळाची गरज   दिवाणी न्यायाधीश जी  ए  कुलकर्णी
Advertisement
कुडाळ / वार्ताहर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकांशी आणि घरी पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे ही काळाची गरज आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट प्रसंगांची माहिती पालक आणि शिक्षकांना दिल्यास योग्य वेळी उपाययोजना करता येतात. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा 1098 या बाल हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार कुडाळ तालुक्यात ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात येत आहे. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

या अभियानाचा शुभारंभ कुडाळ-कुडाळेश्वरवाडी येथील बॅ. नाथ पै हायस्कूलमध्ये दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक ॲड. तृप्ती प्रभुदेसाई, कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे, पोलीस हवालदार गुलाब गोसावी, पोलीस नाईक आर. डी. गुरव, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. सी. राठोड, न्यायालयीन कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ‘शेअरिंग इज केअरिंग’ या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मनातील भीती किंवा अडचणी विश्वासू व्यक्तींशी बोलून दाखवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

ॲड. तृप्ती प्रभुदेसाई यांनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे महत्त्व तसेच कोणताही अनुचित प्रसंग घडल्यास आई-वडील आणि शिक्षकांशी मोकळेपणाने बोलण्याचे आवाहन केले.

पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनपेक्षित प्रसंगाला न घाबरता सामोरे जावे, तसेच आपल्यासोबत घडणारी कोणतीही घटना पालक किंवा शिक्षकांपासून लपवू नये, असे सांगितले. पोलीस हवालदार गुलाब गोसावी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी कुडाळ तालुका बार असोसिएशन आणि बॅ. नाथ पै हायस्कूल यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक प्रवीण सुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक अधीक्षक एस. डब्ल्यू. पई, वरिष्ठ लिपिक के. टी. कदम आणि शिपाई जे. के. चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.