For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुतरामहट्टी येथे धावणार सफारी बस

10:42 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भुतरामहट्टी येथे धावणार सफारी बस
Advertisement

सफारी बसची संख्या तीनवर : वयोवृद्ध-बालकांची गैरसोय दूर, वन्य प्राण्यांचे आकर्षण

Advertisement

बेळगाव : भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातील येणाऱ्या पर्यटकांसाठी आणखी एक नवीन सफारी बस दाखल होणार आहे. रविवारपासून संग्रहालयात ही बस कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे बालक आणि वयोवृद्ध पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे. विशेषत: या बसच्या माध्यमातून वन्य प्राण्यांना अगदी जवळून पाहता येणार आहे. भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात आला आहे. या ठिकाणी वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या, मगर, कोल्हे, सांबर, चितळ, हरिण यासह दुर्मीळ पक्षी आणि मत्स्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा कायम आहे. शनिवारी, रविवारी प्राणी संग्रहालय पर्यटकांनी फुल्ल होऊ लागले आहे. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नही 50 हजारांच्या पुढे जात आहे. तब्बल 39 हेक्टरमध्ये हे प्राणी संग्रहालय विस्तारले आहे. यामध्ये विविध वन्यप्राणी ठेवण्यात आले आहेत. मात्र प्राणी संग्रहालय फिरताना बालक आणि वयोवृद्धांची गैरसोय होत आहे. याची दखल घेत प्राणी संग्रहालय व्यवस्थापनने नवीन सफारी बस आणली आहे. पूर्वी दोन सफारी बस होत्या. त्यामध्ये आणखी एक बसची भर पडली आहे. त्यामुळे संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयीन सुटी असल्याने पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. कर्नाटकबरोबर महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयात सफारी बसची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना या बसच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयाचा आनंद लुटणे सोयिस्कर होणार आहे. मंगळवार वगळता इतर दिवशी संग्रहालय सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत खुले ठेवत आहे.

पर्यटकांच्या संख्येतही वाढ

पर्यटकांची गैरसोय ओळखून संग्रहालयात सफारी बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वयोवृद्ध व बालकांना संग्रहालय फिरता येणार आहे. त्याबरोबर आणखी एक वाघ आणण्यासाठी बेंगळूर प्राणी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे.

- के. एन. वेन्नूर-भुतरामहट्टी आरएफओ

Advertisement
Advertisement
Tags :

.