For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रक्रियेनंतर सद्गुरुना डिस्चार्ज

06:49 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रक्रियेनंतर सद्गुरुना डिस्चार्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अध्यात्मिक गुरु आणि ईशा फौंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांना मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांची प्रकृती सुधारत असून ते पूर्वस्थितीत परतले आहेत. सद्गुरू यांच्या आरोग्यासंबंधी विचारणा करणाऱ्या लाखो लोकांना कुठलीच चिंता करण्याची गरज नसल्याचे अपोलो हॉस्पिटल्स ग्रूपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका डॉ. संगीता रेड्डी यांनी म्हटले आहे.

ईशा फौंडेशनने यादरम्यान सद्गुरी यांना  सर्वांकडून मिळालेले प्रेम आणि समर्थनासाठी आभार मानले आहेत. 66 वर्षीय अध्यात्मिक गुरुला 17 मार्च रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चक्कर येणे आणि डाव्या पायात कमजोरीची समस्या त्यांना जाणवत होती. डॉ. विनीत सूरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी यांच्या टीमने काही तासांमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांना व्हेंटिलेटरवरून हटविण्यात आले होते.

Advertisement

ईशा फौंडेशननुसार अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांनी सद्गुरी यांना वैद्यकीय तपासणी करविण्याचा सल्ला दिला होता. यानंतर तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे आढळून आले होते. शस्त्रक्रिया पार पडल्यावर सद्गुरू यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी फोनवरून संवाद साधला होता. तसेच ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली होती.

Advertisement
Tags :

.