न्हावेली भजन स्पर्धेत सद्गगुरु भजन मंडळ प्रथम
न्हावेली /वार्ताहर
न्हावेली - पार्सेकरवाडी येथील स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली कै.भूषण उदय पार्सेकर व कै.उदय शांताराम पार्सेकर स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत अणसूरचे सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.श्री नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव द्वितीय तर मातोंडच्या श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,तृतीय क्रमांक मिळविला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली पार्सेकरवाडी येथील जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर,मळेवाड उपसरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत हेमंत मराठे,सदस्य अपर्णा सातोसकर,धनश्री मराठे,नेहा पार्सेकर,हेमचंद्र सावळ,मोहन पालेकर,आनंद नाईक,न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर,रमेश निर्गुण,तेजस्वी पार्सेकर,भाजपा सरचिटणीस प्रसाद गावडे,एकनाथ परब,दिलीप पार्सेकर,सुंदर पार्सेकर,देव्या सुर्याजी,चंद्रकांत पार्सेकर,बंड्या दळवी,सागर लाडोबा मांजरेकर,जाधव,त्रिंबक आजगावकर,अन्य मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण आठ भजन संघानी सहभाग घेतला होता.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे ----
उत्कृष्ट गायक - हर्षल मेस्री ( सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसूर ) उत्कृष्ट तबला - महंत नेमण ( चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ,सुरंगपाणी वेंगुर्ला ) उत्कृष्ट पखवाज - विशाल कोंडुसकर ( नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव ) उत्कृष्ट हार्मोनियम - ओमकार कुंभार ( नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव ) उत्कृष्ट झांज - रोहन सावंत ( श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ,सातुळी ) उत्कृष्ट कोरस - ( इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ) यांना देण्यात आला.स्पर्धेचे परीक्षण आनंद मोर्ये ( आंदूर्ले ) व स्वप्नील गोरे ( तुळस) यांनी काम पाहिले.तसेच पारितोषिक वितरण समारंभाला दिलीप पार्सेकर,लाडोबा मांजरेकर,सुदन पार्सेकर,सागर जाधव,सुंदर पार्सेकर,सुरज पार्सेकर,त्रिंबक आजगावकर रविंद्र दळवी,चंद्रकांत पार्सेकर,समिर पार्सेकर,व स्वरभूषण मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते व भजनप्रेमी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले.