For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथी २० जानेवारीला

12:19 PM Jan 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथी २० जानेवारीला
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज मठ येथे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पालखी सोहळा, भजनांचे कार्यक्रम आणि मालवणी नाटकाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.उत्सवाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल. श्री सद्गुरू राजाराम महाराजांच्या स्मारकाकडून त्यांच्या निवासस्थानापर्यंत नामघोषात पालखी सोहळा काढला जाणार आहे. या सोहळ्याने तीन दिवसीय उत्सवाचा प्रारंभ होईल.​बुधवार, २१ जानेवारी रोजी पहाटे ५:३० वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि दुपारी १२:०० वाजता महाआरती संपन्न होईल. दुपारी १:०० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ४:०० वा. गोव्यातील नामांकित 'ओम श्री ब्रह्मा लिंगेश्वर महिला भजन मंडळ' (वास्को) यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल. (पुरस्कर्ते: श्रीमती तारा नाईक),​सायंकाळी ७:०० वा.आरती, ​रात्री ८:०० वा. कलानिकेतन नाट्य मंडळ आणि स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.​गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती होईल. त्यानंतर दुपारी १२:०० वाजल्यापासून महाप्रसाद वाटप करण्यात येईल. सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. ​या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे रात्री ९:०० वाजता कलानिकेतन नाट्य मंडळ, इन्सुली गावठणवाडी सादर करणार असलेले 'शेवटचो प्रयोग' हे नाटक. दशावतार कलाकारांच्या जीवनावर आधारित हे हृदयस्पर्शी मालवणी नाटक होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गावठणवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.