महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-पाक सामन्यास सचिनची उपस्थिती?

06:37 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला 1 जूनपासून विंडीज-अमेरिका येथे सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी पाठिंबा देण्यासाठी खास व्यक्ती उपस्थित राहणार आहे. 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत व पाकिस्तान या हायप्रोफाईल सामन्यासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

आयसीसीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, 51 वर्षीय तेंडुलकर या स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एकाचा ब्रँड अँबॅसेडर असून नासाऊ कौंटी मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. या सामन्याला प्रचंद प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा केली जात असल्याचेही त्याने सांगितले. ‘सामना सुरू होण्याआधी सचिन संघातील खेळाडूंची भेट घेणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याची केवळ उपस्थितीच संघाचे मनौबल वाढविणारी असते,’ असे या सूत्राने सांगितले.

2015 च्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचाही सचिन आयसीसीचा ब्रँड अॅम्बॅसेडर होता. त्याने 1992-2011 या कालावधीत सहा वनडे वर्ल्ड कप स्पर्धांत खेळण्याचा बहुमान मिळविला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article