For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर

03:42 PM Apr 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर
Advertisement

निवड प्रक्रिया बिनविरोध : कार्यकारणीही जाहिर

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या २०२५-२७ या दोन वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीत समितीच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर यांची तर सचिवपदी विजय राऊत, सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव, दिव्या वायंगणकर, खजिनदारपदी रामचंद्र कुडाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर अन्य कार्यकारणी सदस्यांची ही यावेळी निवड करण्यात आली.परिषद प्रतिनिधी गणेश जेठे व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ या निवडणूक निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पाडली. त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर केली. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघासह अन्य तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केले. त्यानुसार ही निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली. जिमखाना येथील न.प. हॉल येथे झालेल्या या निवड सभेत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.या कार्यकारणीत सदस्य म्हणून राजू तावडे, नागेश पाटील, रमेश बोंद्रे, संतोष परब, लुमा जाधव, मंगल कामत, अनुजा कुडतरकर, दीपक गांवकर, अजित दळवी, भुषण आरोसकर, निलेश परब यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन धारणकर, विजय राऊत, सचिन रेडकर, हेमंत मराठे, हरिश्चंद्र पवार हे इच्छुक होते. यावेळी सर्वांनुमते सचिन रेडकर यांची बिनविरोध निवड करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच संपुर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली. यावेळी मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी त्यांच्या कार्यकाळातील केलेल्या कार्याबद्दल माहिती देत नव्या कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.तर नूतन अध्यक्ष सचिन रेडकर यांनी अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सर्वांना विश्वासात घेऊन व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विधायक व पत्रकार संघाला अपेक्षित काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, राजू तावडे यांनी शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी मानले. खेळीमेळीच्या वातावरण ही निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड.संतोष सावंत,डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राजेश मोंडकर, सागर चव्हाण, विजय देसाई, लुमा जाधव, उत्तम नाईक, आशुतोष भांगले, निलेश मोरजकर, प्रविण परब, विराज परब, विश्वनाथ नाईक, मंगल नाईक-जोशी, जतिन भिसे, समिर कदम, महादेव सावंत, स्वप्नील उपरकर, गुरूनाथ पेडणेकर, अनिल भिसे, अनिल चव्हाण, अभय पंडीत, काका भिसे, दीपक गांवकर, उमेश सावंत, अर्जून राऊळ, अवधुत पोईपकर, प्रा. रूपेश पाटील, रूपेश हिराप, निखिल माळकर, साबाजी परब, भुवन नाईक आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.