सचिन रमला सिंधुदुर्गातील आठवणीत !
माझा 50 वा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा होऊन 250 दिवस झाले ; सचिनने केली पोस्ट
परूळे | प्रतिनिधी
सचिन तेंडुलकरची सोशल मीडियावरील पोस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारी ठरणार आहे. 24 एप्रिल २०२३ रोजी सचिन तेंडुलकरने आपला पन्नासावा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे - किल्ले निवती या परिसरात साजरा केला होता. यावर भाष्य करताना काल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे माझा 50 वा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरे होऊन 250 दिवस झाले!
किनार्यावरील शहराने आम्हाला हवे असलेले सर्व काही ऑफर केले आणि बरेच काही. अप्रतिम आदरातिथ्यांसह एकत्रित भव्य ठिकाणे आमच्यासाठी आठवणींचा खजिना देऊन गेला आहेत.भारताला सुंदर किनारपट्टी आणि मूळ बेटांचा आशीर्वाद आहे. आमच्या "अतिथी देवो भव" तत्वज्ञानाने, आपल्याकडे शोधण्यासारखे बरेच काही आहे, कितीतरी आठवणी निर्माण होण्याची वाट पाहत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिल्यानंतर मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत भारतावर टीका केली होती. याचे पडसाद भारतात दिसू लागले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी पर्याय असू शकतो, असं 'एक्स' या सोशल माध्यमावर पोस्ट करत सांगितलं. तर या सोशल माध्यमावर 24 एप्रिल 2022 रोजी सचिन तेंडुलकरने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे किल्ले निवती बीचचा फोटो आणि भोगवे किल्लेनिवती बीचवर आपण खेळत असतानाचा व्हिडिओ या सोशल माध्यमावर अपलोड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जाईल यात शंका नाही.