महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सचिन पायलट यांचे उघड बंड

07:09 AM May 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराशी लढण्याचा निर्धार, 15 दिवसांचा अंतिम कालावधी 

Advertisement

वृत्तसंस्था / जयपूर

Advertisement

भ्रष्टाचाराशी लढण्याचा आपला निर्धार असून आपण कोणालाही घाबरत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थानचे काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी केले आहे. आपल्याच सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची सांगता त्यांनी जयपूर येथे सोमवारी केले. संघर्ष सुरुच ठेवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज्य सरकारला आपण 15 दिवसांचा अवधी देत आहोत. या काळात भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर पावले न उचलल्यास राज्यभर आंदोलनाचा भडका उडवून दिला जाईल. मागच्या वसुंधराराजे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातही मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागेल. राजस्थानमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे असंख्य अभ्यासू आणि बुद्धीमान विद्यार्थ्यांची मोठी हानी झाली आहे. या विद्यार्थ्यांना भरपाई देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. ती पार न पाडल्यास राज्यसरकारविरोधात व्यापक आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणालाही डरत नाही

ज्यांनी भ्रष्टाचाराची मलई खाल्ली आहे, त्यांच्या धमकावण्यांना मी घाबरत नाही. राज्यातील तरुणांच्या हृदयांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आग भडकविण्यासाठी मी राज्यभर संघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेची आता सांगता होत आहे. पण याचा अर्थ आंदोलन थांबले असा होत नाही. उलट ते अधिक मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे अनेक लोक घाबरले आहेत. माझा परिवार राजकारणात गेली 45 वर्षे आहे. मात्र, कोणत्याही विरोधी नेत्याने माझ्यावर कोणताही आरोप करण्याचे धाडस दाखविलेले नाही. आता राज्य सरकारने माझे आव्हान स्वीकारावे, असा इशारा त्यांनी दिला.

पदाचा मोह नाही

मी तरुण वयापासून समाजजीवनात आहे. मला कोणत्याही पदाचा मोह नाही. माझी काम करण्याची पद्धत आणि माझी निष्ठा यावर कोणीही संशय व्यक्त केलेला नाही. मी कोणत्या पदावर असेन किंवा नसेन, शेवटच्या श्वासापर्यंत मी राजस्थानच्या जनतेची सेवा करत राहीन. नि:स्वार्थ सेवा करण्याची माझी परंपरा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर युवकांच्या हितासाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मी संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. मला कोणीही रोखू शकत नाही. मी कोणत्याही नेत्याच्या व्यक्तीश: विरोधात नाही. तथापि, जनतेवरचा अन्याय सहन करणे मला शक्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राजस्थानची जनता समंजस

भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र मी सरकारला लिहिले. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही मी पत्र पाठवून सूचना केली. भ्रष्टाचाराविरोधात उपोषणही केले. तथापि, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा मुद्दा जनतेच्या दरबारात नेण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. अत्यंत गुप्तपणे ज्या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात, त्या फुटतात कशा ? याचाच अर्थ असा की, सर्व यंत्रणा किडलेली आहे. ती अमूलाग्र नष्ट करुन तिच्या जागी नवी समर्थ यंत्रणा आणावी लागणार आहे. आमच्या युवकांचे आयुष्य अंध:कारमय होत आहे. 25 लाख तरुण प्रत्येक वर्षी गाव सोडून शहरांकडे धाव घेत आहेत. तेथे शिकवण्या घेत आहेत. त्यांचे आईवडील पोटाला चिमटा घेऊन त्यांचा खर्च करत आहेत. अशावेळी प्रश्नपत्रिका फुटल्या तर त्यांची अवस्था काय होईल, असा प्रश्न त्यांनी गेहलोत सरकारला केला. संघर्ष यात्रा सांगतेच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री गेहलोत लक्ष्य

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पायलट यांची थेट स्पर्धा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी काही आमदारांसह बंडही केले होते. पण पुरेशा संख्येने आमदार जमवता न आल्याने बंड फसले. तथापी, त्यांचा गेहलोत यांच्याशी संघर्ष थांबलेला नाही, हे या संघर्ष यात्रेवरुन दिसून येत आहे. राजस्थानात नुकतेच प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण घडले आहे. हा मुद्दा राज्यव्यापी बनवून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पायलट यांचा आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

संतप्त पायलट डोकेदुखी ठरणार ?

ड आपल्याच सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उघड आंदोलन

ड प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी राज्यव्यापी संघर्षाचा केला निर्धार

ड राजस्थानात वर्षअखेरीस होणार महत्वपूर्ण विधानसभा निवडणूक

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article