खानोली उपसरपंचपदी सचिन परब यांची बिनविरोध निवड
वेंगुर्ले (वार्ताहर)-
खानोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन परब यांची बिनविरोध निवड झाली आहे.खानोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सचिन परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी प्रितम पवार यांनी काम पाहिले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुभाष खानोलकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील घाग, साधना पवार, बाळकृष्ण मेस्त्री, रूपाली प्रभू-खानोलकर, अमिता खानोलकर आदी ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी व आडेली जि.प. विभाग प्रमुख नरेश बोवलेकर यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजप भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी शरद चव्हाण, पोलीस पाटील धोंडू खानोलकर, बाळा सावंत सुनील सावंत, उमेश सावंत श्यामा खानोलकर, अण्णा खानोलकर, बाळू खानोलकर, यतीन आवळेगावकर, संतोष खानोलकर, प्रणाली खानोलकर नम्रता केरकर, संजय प्रभू, महेश प्रभू, सुधाकर खानोलकर, किरण प्रभू खानोलकर, अरुण खानोलकर, सचिन नार्वेकर, ओंकार खानोलकर, जीवन राऊळ, गौरेश खानोलकर, नाथा खाडे, हेरंब प्रभू खानोलकर, निखिल राऊळ, महेश नार्वेकर, सुहास कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी, ' खानोली गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने विकासाचे निर्णय घ्यावेत. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ की लावून विकास करावा. आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कडे प्रयत्न करुन या भागातील विकास कामांना निधी मिळवून दिला जाईल असे स्पष्ट केले.