For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरवलीतील सचिन दळवींचा शेतकरी फेलो 2026 पुरस्काराने सन्मान

05:09 PM May 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आरवलीतील सचिन दळवींचा शेतकरी फेलो 2026 पुरस्काराने सन्मान
Advertisement

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचा पुरस्कार

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली च्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या दापोली येथील कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या हस्ते सचिन दळवी यांचा "शेतकरी फेलो 2026 हा पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला. प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. पुढील तीन वर्षे विद्यापीठाचे कृषिदूत म्हणून ते कार्यरत राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली या छोट्याश्या गावामध्ये श्री. सचिन उर्फ पुरुषोत्तम दळवी शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. सन 2000 पासून त्यांनी छोट्या प्रमाणावर आवड म्हणून गांडूळखत बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. शेतातील काडी कचरा फुकट न घालवता त्याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने त्यांनी त्यावेळी काम सुरु केले. सुरवातीच्या काळात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. पराग हळदणकर, डॉ. संदीप गुरव व डॉ. हेमंत बोराटे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यावेळी डॉ. गुरव व डॉ. बोराटे यांनी त्यांची यशोगाथा अँग्रोवन दैनिकातून प्रसिद्ध केली होती. त्या यशोगाथेच्या माध्यमातून त्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्रभर झाली. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांडूळ खत व्यवसायिक स्वरूपात सुरु केले आणि काही वर्षात त्यांची "गांडूळखत वाले दळवी" म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. पुढे त्यांनी काथ्या उद्योगाची माहिती व प्रशिक्षण घेऊन तो व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरु केला. स्वतःचा व्यवसाय करत असताना श्री. दळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो. विद्यापीठाचे कुलगुरू, विविध शास्त्रज्ञ, राजकीय नेते मंत्री आणि विद्यार्थी अशा कित्येक जणांनी त्यांच्या प्रकल्पाला भेटी देऊन माहिती घेतलेली आहे. कृषी विभागाच्या आत्मा या समितीवर त्यांनी सकारात्मक काम केलेले आहे.वयाच्या 56व्या वर्षात देखील शेतीसाठी वाहून घेतलेल्या अशा शेतकऱ्याचा सन्मान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत झाला ही सिंधुदुर्ग जिह्यासाठी अभिमानस्पद बाब आहे. याबद्दल श्री. दळवी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.