For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : पडवे जि. प. गटात सचिन बाईत यांचा प्रचार झंझावात, प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद

03:56 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri   पडवे जि  प  गटात सचिन बाईत यांचा प्रचार झंझावात  प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

                           पडवे जि. प. गटात सचिन बाईत यांची प्रचारात आघाडी

Advertisement

गुहागर : गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पडवे जिल्हा परिषद गटात अनेक कामे मार्गी लावणारे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना उमेदवार सचिन बाईत यांनी पडवे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे.

जि. प. पडवे गटामध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सचिन बाईत यांनी प्रत्येक घराघरापर्यंत पोहचण्याचे नियोजन केले आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख पदावरून तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पडवे जि. प. गटातील छोटय़ा-मोठया अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत.

Advertisement

यामुळे केवळ निवडणूक आली की जनतेजवळ न पोहचता सुरूवातीपासूनच त्यांचा या गटातील प्रत्येक गाव-वाडी यांच्याजवळ दांडगा संपर्क राहिला आहे. येथील परिसरासाठी शैक्षणिक, सामाजिक, सहकार व सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. आबलोली, खोडदे, भातगाव, काजुर्ली, कुडली, पाचेरीसडा, जांभारी, शिवणे, कोळवली, पडवे, तवसाळ, काताळे, असोरे, गोळेवाडी, पाचेरीआगर, आंबेरे यांसारख्या गावांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उद्योग व्यवसायातून अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिल्याने ‘आपला माणूस सचिनदादा' असा सूर या गटातील प्रत्येक गावातून निघत आहे.

मतदार संघात चांगली बांधणीरस्ते, पाणी या समस्यांवर काम करताना अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोविड काळात आवश्यक औषध पुरवठा, जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याचे काम केले आहे. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना सहकार्याचा हात दिला असल्याने सचिन बाईत यांनी हा गट चांगल्या पद्धतीने बांधला आहे. मतदारांसमोर जाताना त्या त्या गावातील नियोजनबद्ध विकासाचा आराखडा ते समोर ठेवत आहेत. प्रत्येक गावातून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.

त्यांच्या या प्रचाराच्या झंझावातामध्ये ठाकरे शिवसेनेचे तालुका सचिव विलास गुरव, उपतालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, उपविभागप्रमुख शरद साळवी, जगदीश गडदे, प्रत्येक बुथचे सर्व शाखा प्रमुख, शरद पवार राष्ट्रवादी, मनसे, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत दोन फेऱया पूर्ण झाल्या असून स्वत उमेदवार सचिन बाईत यांच्या अनेक फेऱया होत आहेत. यामुळे पडवे गटामध्ये सचिन बाईत यांनी मतदार संघात चांगली वातावरण निर्मिती केली आहे.

Advertisement
Tags :

.