सचिन अहिर यांचा शिंदे सेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का : उपसभापतीपदासाठी भरला अर्ज
मुंबई,
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने एक नवा ट्विस्ट समोर आणला आहे. ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटून एक आठवडाही होत नाही तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. शिंदे यांनी वरळीतील ठाकरे गटाचे खंदे शिलेदार आणि विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना फोडून त्यांना थेट उपसभापतीपदाची उमेदवारी देत अर्जही दाखल केला. शिंदे यांच्या या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे शिंदे यांच्या अनपेक्षित खेळीने या पदासाठी इच्छुक असलेल्या माजी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे नाराज झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात ‘ऑपरेशन टायगर‘ राबवून ठाकरे सेनेचे सहा खासदार फोडले. त्यापाठोपाठ ठाकरेंचे अनेक आमदारही शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नुकत्याच सुऊ असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘आणखी झटके देणार‘ असल्याचा इशाराही ठाकरे गटाला दिला होता.
राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांना कानोकान माहिती नसताना सचिन अहिर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्यावतीने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. ही माहिती वेगाने पसरताच प्रसामाध्यमांमध्ये ठाकरे सेनेचे आमदार अहिर फुटल्याची बातमी झळकली. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आम्ही इथे तोडायला नाही, तर जोडायला आलो : एकनाथ शिंदे
सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि सचिन अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘आम्ही कोणत्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, तर जोडकाम करतो. आम्ही इथे तोडायला नाही, तर जोडायला आलो आहोत. काही लोक तुडवायला आले, पण आम्ही शिवसेना (wाrपएमदं) वाढवायला आलो आहोत. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणे हा नसून, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवणं हाच आमचा अजेंडा आहे’, असे शिंदेंनी म्हटले.
वेळेवर योग्य रितीने योग्य उत्तर देईन : अहिर
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले, त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केले. सरकारमध्ये राहून काम केले पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतफत्वात करणार आहे. उपसभापतीपदासाठी अनेक लोकांची नावे घेता येतील. रा. सू. गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून मोठे काम केले, तीच गरीमा मी ठेवणार आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणार आहे.