For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

टॉम हॉलंडच्या चित्रपटात सबरीना कारपेंटर

06:22 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
टॉम हॉलंडच्या चित्रपटात सबरीना कारपेंटर
Advertisement

फ्रेड एस्टेयर बायोपिकच्या तयारीला वेग

Advertisement

सोनी पिक्चर्सच्या आगामी फ्रेड एस्टेयर बायोपिकमध्ये आता ‘द सब्सटेंस’ स्टार मार्गारेट क्वाली आणि ग्रॅमी विजेता सबरीना कारपेंटरची एंट्री झाली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहच. चित्रपटात टॉम हॉलंड हा फ्रेड एस्टेयरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर मार्गारेट ही त्याची बहिण आणि प्रारंभिक डान्स पार्टनर एडेल एस्टेयरच्या भूमिकेत दिसेल. सबरीना यात फ्रेड एस्टेरची प्रसिद्ध ऑन स्क्रीन डान्स पार्टनर जिंजर रोजर्सची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल किंग करणार आहे आणि याच्या निर्मितीची जबाबदारी एमी पास्कल सांभाळत आहे. पॉल किंगने स्टीवन्स लेवेंसनसोबत मिण्tन या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. हा चित्रपट कॅथलिन रिले यांचे पुस्तक ‘द एस्टेयर्स : फ्रेड अँड एडेल’वर आधारित आहे. फ्रेड आणि एडेल एस्टेयरने ब्रॉडवे आणि लंडनच्या वेस्ट एंडवर डान्स जोडी म्हणून नाव कमाविले होते. यानंतर फ्रेड एस्टेयर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध म्युझिक स्टार झाला. खासकरून जिंजर रोजर्ससोबत त्याची जोडी लोकांच्या पसंतीस पडली. दोघांनी ‘द गे डिवोर्सी’, ‘टॉप हॅट’ आणि ‘स्विंग टाइम’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Advertisement

फ्रेड एस्टेयरने स्वत:च्या सुमारे 7 दशके लांब कारकीर्दीत 30 हून अधिक सांगितिक चित्रपटांमध्ये काम केले. याचबरोबर त्याने ब्रॉडवे आणि वेस्ट एंडवरही स्वत:ची ओळख निर्माण केली. जिंजर रोजर्ससोबत त्याची जोडी आजही चित्रपटांमधील प्रसिद्ध डान्स जोड्यांपैकी एक मानली जाते. टॉम हॉलंड सुमारे 5 वर्षांपासून या चित्रपटात फ्रेड एस्टेयरची भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे. तो या चित्रपटाचा निर्माता म्हणूनही काम करणार आहे.

Advertisement
Tags :

.