'साबरमती रिपोर्ट' नववर्षात येणार ओटीटीटवर
मुंबई
' द साबरमती रिपोर्ट' प्रदर्शित झाल्यापासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीच्या मुख्य भूमिकेतील 'द साबरमती रिपोर्ट' हा १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या घटनेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केले आहे. एकता कपूर, शोभा कपूर, अंशूल मोहन आणि अमूल व्ही मोहन यांनी ये सिनेमाची निर्मिती केलेली आहे.
या सिनेमा प्रदर्शित झाल्यावर खूप चर्चेत होता. सिनेमाशी निगडीत घटनाक्रम सुरूच होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफीस म्हणावे तशी जादू करू शकला नाही. या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग एनडीए सरकारच्या खासदारांसाठी करण्यात आले होते.
हा सिनेमा आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या १० जानेवारी रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. २००२ मध्ये गुजरात गोध्रा येथे ट्रेन अग्निकांड यावर या सिनेमाचे कथानक अवलंबून आहे. सिनेमात विक्रांत मेस्सीने स्थानिक पत्रकाराची भूमिका साकारली आहे.