For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साबालेंका, मुचोव्हा उपांत्य फेरीत

06:20 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
साबालेंका  मुचोव्हा उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / ब्रिस्बेन

Advertisement

2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा सरळ सेट्समध्ये पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली.

शुक्रवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साबालेंकाने मॅडिसन किजचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना सुमारे 90 मिनिटे चालला होता. 18 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता उपांत्य फेरीत या स्पर्धेतील विद्यमान विजेती साबालेंकाची लढत 11 व्या मानांकीत मुचोव्हाशी होणार आहे.

Advertisement

11 व्या मानांकीत कॅरोलिना मुचोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इलिना रायबाकिनाचा 6-2, 2-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. या पराभवामुळे रायबाकिनाची गेल्या 13 सामन्यातील विजयी घोडदौड खंडीत झाली. साबालेंकाने यापूर्वी इंडियन वेल्स स्पर्धेत किजचा सरळ सेट्समध्ये पराभव केला होता. साबालेंकाने गेल्या वर्षी फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती तर तिने गेल्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत साबालेंकाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Advertisement
Tags :

.