For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एस-400 क्षेपणास्त्राने गाठले 80 टक्के लक्ष्य

06:39 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एस 400 क्षेपणास्त्राने गाठले 80 टक्के लक्ष्य
Advertisement

400 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम, हवाई दलाकडून सराव

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाच्या सुदर्शन एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने युद्ध सरावात शत्रूची 80 टक्के लढाऊ विमाने पाडली. हवाई दलाच्या युद्ध सरावादरम्यान लष्कराच्या उर्वरित लढाऊ विमानांना माघार घ्यावी लागली आणि त्यांना मोहीम रद्द करावी लागली.

Advertisement

हवाई दलाने थिएटर स्तरावरील युद्ध सराव आयोजित केला होता. या सरावात एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा एक स्क्वॉड्रन तैनात करण्यात आला होता. यावेळी हवाई दलाची राफेल, सुखोई आणि मिग लढाऊ विमाने शत्रूच्या रूपात उडाली. याप्रसंगी एस-400 ने लक्ष्य गाठत सुमारे 80 टक्के लढाऊ विमाने अचूकपणे टिपली. या सरावाचा उद्देश एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या क्षमतेची चाचणी घेणे हा होता.

रशियाकडून आयात करण्यात आलेल्या एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमध्ये 400 किलोमीटर अंतरावरून आपले लक्ष्य शोधून प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी याला ‘सुदर्शन’ असे नाव दिले आहे. सुदर्शन चक्र हे भगवान श्रीकृष्णाचे प्रमुख शस्त्र आहे.

रशियाकडून एस-400 प्राप्त

एस-400 च्या पाच स्क्वॉड्रनसाठी भारत आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये 35 हजार कोटी ऊपयांचा करार झाला आहे. यापैकी 3 स्क्वॉड्रन चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. आणखी 2 येणे बाकी आहे. रशिया-युव्रेन युद्धामुळे त्याला विलंब होत आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत ते हवाई दलाला दिले जातील, अशी अपेक्षा आहे. एस-400 देशाच्या सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरतील असा विश्वास लष्कराला आहे. युव्रेनविऊद्धच्या युद्धात रशियाने एस-400 क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

भारतीय हवाई दलाला अलीकडेच स्वदेशी एमआर-एसएएम, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली तसेच इस्रायली स्पायडर क्विकरिअॅक्शन पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली प्राप्त झाली आहे. संरक्षण परिषदेने कुशा प्रकल्पांतर्गत लांब पल्ल्याच्या पृष्ठभागावरील हवाई क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीलाही नुकतीच मान्यता दिली आहे.

एस-400 प्रणाली म्हणजे काय?

एस-400 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. हे हवेतून होणारे हल्ले टाळते. क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट लॉन्चर आणि शत्रू देशांच्या लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी ते प्रभावी आहे. हे रशियाच्या अल्माझ सेंट्रल डिझाईन ब्युरोने तयार केले असून जगातील सर्वात आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींमध्ये गणले जाते.

Advertisement
Tags :

.