कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रायन विल्यम्स भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी

06:43 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय नागरिक होण्यासाठी ऑस्ट्रेलियन पासपोर्ट सोडून देणारा फॉरवर्ड रायन विल्यम्स बेंगळूर येथील खालिद जमील प्रशिक्षित राष्ट्रीय संघाच्या शिबिरात सामील झाला आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) रविवारी सांगितले.

Advertisement

पर्थमध्ये जन्मलेला हा 32 वर्षीय खेळाडू बचावपटू जय गुप्ता याच्यासह शिबिरात सहभागी झाला आहे. फॉरवर्ड रायन विल्यम्स आणि बचावपटू जय गुप्ता बेंगळूर येथील वरिष्ठ पुऊष राष्ट्रीय संघाच्या शिबिरात सामील झाले आहेत, असे एआयएफएफने ‘एक्स’वर पोस्ट केले. भारतीय फुटबॉलसाठी एक नवीन सुऊवात म्हणून खेळाचा राष्ट्रीय महासंघ असलेल्या एआयएफएफने या आठवड्याच्या सुऊवातीला 18 नोव्हेंबर रोजी ढाका येथे बांगलादेशविऊद्ध होणाऱ्या एएफसी आशियाई कप पात्रता सामन्यापूर्वीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी विल्यम्स आणि अबनीत भारती या दोन परदेशी खेळाडूंना निवडले आहे.

हे पाऊल अडचणीत सापडलेल्या महासंघाच्या दृष्टिकोनातील धाडसी बदल दाखवून देते, ज्यामुळे भारतीय वंशाच्या खेळाडूंना आणि देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी परदेशी नागरिकत्व सोडण्यास इच्छुक असलेल्यांसाठी दरवाजे उघडले आहेत. शिबिर गुऊवारी बेंगळूरमध्ये सुरू झाले. विल्यम्सला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याचा समारंभ सुनील छेत्री याने बेंगळूर एफसीच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित केला होता. या क्लबकडून तो इंडियन सुपर लीगमध्ये खेळतो. ‘जे खूप दिवसांपासून प्रत्यक्षात येईल असे वाटत होते ते अधिकृतपणे सांगताना मला सन्मान वाटतो. या देशाने मला दिलेल्या प्रेमाबद्दल, संधीबद्दल आणि आपुलकीच्या भावनेबद्दल मी आभारी आहे. मुलाखतींचा शेवटचा टप्पा सर्वांत कठीण होता. भारत, मी तुमचाच एक आहे!’, असे विल्यम्सने यापूर्वी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते.

विल्यम्सची आई मुंबईत जन्मली, तर त्याचे वडील केंट, इंग्लंडमध्ये जन्मले. भारतीय फुटबॉल संघातर्फे खेळण्यासाठी ‘ओसीआय’ (ओव्हरसिज सिटिझन्स ऑफ इंडिया) पात्र ठरण्याची ही फक्त दुसरी घटना आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या 20 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील संघांसाठी खेळला आहे आणि 2019 मध्ये दक्षिण कोरियाविऊद्धच्या मैत्रिपूर्ण सामन्यात दुसऱ्या सत्रामध्ये बदली खेळाडू म्हणून वरिष्ठ संघाचे प्रतिनिधीत्व देखील केलेले आहे. 2023 मध्ये आयएसएल संघ बेंगळूर एफसीमध्ये सामील होण्यापूर्वी त्याने फुलहॅम आणि पोर्ट्समाऊथ या इंग्लिश क्लबांचे प्रतिनिधीत्व केले होते. विल्यम्सच्या आधी जपानमध्ये जन्मलेल्या इझुमी अराटाने 2012 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय नागरिकत्व घेतले होते आणि 2013 आणि 2014 मध्ये भारतातर्फे तो नऊ सामन्यांमध्ये खेळला होता.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article