रायन टेन डोशेट यांचे केकेआरमध्ये पुनरागमन
► वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर रायन टेन डोशेट यांची कोलकाता नाईट रायडर्सच्या क्रिकेट रणनीती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
टेन डोशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आता भारतीय संघाशी सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून संबंधित नाहीत. कारण बीसीसीआयने पुष्टी केली आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. नेदरलँड्सचे माजी फलंदाज आता केकेआर फ्रँचायझीमध्ये एक नवीन भूमिका स्वीकारतील. जिथे ते जगभरातील त्यांच्या संघांसाठी क्रिकेट रणनीती, खेळाडूंची निवड आणि विकासाची देखरेख करतील.
टेन डोशेट हे केकेआर फ्रँचायझीमध्ये खेळाडू शोधणे, खेळाडूंची भरती, संघ नियोजन आणि कामगिरी मूल्यांकनासाठी धोरणात्मक दिशा देतील. टेन डोशेट हे केकेआरच्या प्रशिक्षण संघांसोबत काम करून सर्व फ्रँचायझींमध्ये एक सुसंगत क्रिकेट तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन तयार करण्यास मदत करतील. तो सीपीएलमध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्स, आयएल टी-20 मध्ये अबू धाबी नाईट रायडर्स आणि एमएलसीमध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्स या संघांचा साहाय्यक प्रशक्षक म्हणूनही काम पाहणार आहे.