रयान गोसलिंग होणार पुढील घोस्ट रायडर
तीनवेळा ऑस्करचे नामांकन मिळविलेला रयान गोसलिंग आता मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हिस्सा ठरला आहे. मार्वलचा पुढील घोस्ट रायडर म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ‘स्टार वॉर्स : स्टारफायटर“नंतर गोसलिंग 2028च्या चित्रपटासाठी दिग्दर्शन शॉन लेवीसोबत पुन्हा काम करत आहे.
नवा घोस्ट रायडर चित्रपटाचे सध्या काम सुरु आहे. हा चित्रपट 2028मध्ये प्रदर्शित होऊ शकतो असे मार्वल स्टुडिओचे अध्यक्ष केविन फीगे यांनी सांगितले आहे. घोस्ट रायडरसारखी भूमिका मी दीर्घकाळापासून साकारू इच्छित होतो असे उद्गार रयानने काढले आहेत.
ऑस्कर विजेता निकोलस केजने प्रथम ‘घोस्ट रायडर“ (2007) आणि ‘घोस्ट रायडर : स्पिरिट ऑफ वेंजेंस“ (2011) मध्ये ही भूमिका साकारली होती. या चित्रपटांनी जगभरात मोठी कमाई केली होती. हे चित्रपट मोटरसायकल स्टंटमॅन जॉनी ब्लेजच्या अवतीभवती फिरणाऱ्या कहाणींवर आधारित आहेत. चित्रपटातत ाs सूड उगविणारा एजंट असतो.