For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुड-ड्रेपर यांच्यात जेतेपदासाठी लढत

06:32 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
रुड ड्रेपर यांच्यात जेतेपदासाठी लढत
Advertisement

वृत्तसंस्था / माद्रीद

Advertisement

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा कास्पर रुड आणि ब्रिटनचा जॅक ड्रेपर यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कास्पर रुडने फ्रान्सीस्को सेरुनडोलोचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. पाठिच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत रुडने अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले आहे. या स्पर्धेत रुडने यापूर्वीच्या सामन्यात अमेरिकेचा टेलर फ्रित्झ आणि रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव्ह यांना पराभूत केले आहे. रुडने उपांत्य लढतीत सेरुनडोलोचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या लढतीत रुडने 18 पैकी 15 ब्रेक पॉईंटस वाचविले. अर्जेंटिनाच्या सेरुनडोलोला या सामन्यात आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता आलेली नाही. कास्पर रुडने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

Advertisement

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने इटलीच्या लोरेंझो मुसेटीचा 6-3, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. मुसेटी सध्या एटीपीच्या मानांकनांत 15 व्या स्थानावर असून रुड आता या मानांकनात पहिल्या 10 खेळाडूंत स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात सुरूवातीला झालेल्या इंडियन्स वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत ड्रेपरने जेतेपद मिळविले होते. आता तो मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुसरे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Advertisement
Tags :

.