महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

65 युद्धकैद्यांना नेणारे रशियन विमान कोसळले

06:36 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हिडिओ व्हायरल : युक्रेनवर हल्ल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

65 युव्रेनियन युद्धकैद्यांना (पीओडब्ल्यू) घेऊन जाणारे रशियन हेवी-लिफ्ट लष्करी वाहतूक विमान आयएल-76 देशाच्या बेल्गोरोड भागात दुर्घटनाग्रस्त झाले. यासंबंधी एक व्हिडिओही जारी झाला आहे. आयएल-76 विमान पायलटच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि निवासी क्षेत्राजवळ कोसळल्याने विमान वेगाने उंची गमावून थेट जमिनीच्या दिशेने जात असल्याचे या अपघाताच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तथापि, रशियन संसदेचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांनी युक्रेनवरच युद्धकैद्यांना घेऊन जाणारे विमान पाडल्याचा आरोप केला आहे. ‘युक्रेनने आपल्याच सैनिकांना हवेत गोळ्या घातल्या, असे वोलोदिनने पूर्ण सत्रात खासदारांना सांगितले.

स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता विमान नियमित उ•ाणाच्या वेळी बेल्गोरोड प्रदेशात कोसळल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगण्यात आले.  अपघातग्रस्त विमानात युव्रेनियन सैन्याचे 65 पकडलेले सैनिक होते. या युद्धकैद्यांना देवाण-घेवाणीसाठी बेल्गोरोड प्रदेशात नेले जात होते. युद्धकैद्यांसोबत सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट्स होते, अशी माहिती रशियाकडून देण्यात आली. याप्रकरणी योग्य तपास केला जात असून एक विशेष पथक आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी कार्यरत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social_media
Next Article