108 वर्षांनी मणिपूरमध्ये दिसला दुर्मिळ पक्षी; पक्षीप्रेमींना सुखद धक्का
1915 मध्ये अखेरचे झाले होते दर्शन
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये एक महत्त्वाची घटना घडली आहे. येथे 108 वर्षांनंतर एक दुर्लभ रशियन पक्षी बैकाल टील दिसून आला होता. वाइल्ड लाइफ एक्सप्लोरर्स मणिपूर आणि इंडियन बर्ड कॉन्झर्व्हेशन नेटवर्कच्या एका टीमेने लॅम्फेल वेटलँडमध्ये हा शोध लावला आहे. या पक्ष्याला मणिपूरमध्ये आतापर्यंत केवळ दोनवेळा पाहिले गेले आहे. 16 मार्च 1913 आणि 28 नोव्हेंबर 1915 रोजी हा पक्षी दिसून आला होता. नवे दृश्य मणिपूरमध्ये दुर्लक्ष पक्षी प्रजातींच्या संरक्षण प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.
या पक्ष्याच्या प्रजातीची ओळख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून पटविण्यात आली होती. या सु-रीट-मॅन देखील म्हटले जाते. हा पक्षी पूर्व रशियात प्रजनन करतो आणि पूर्व आशियात शतकांपासून स्थलांतर करत आहे. बैकाल टीलला सध्या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (आयसीयूएन) रेड लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. 2011 च्या पूर्वी याची शिकार आणि घरट्याच्या विनाशामुळे एक संवेदनशील प्रजाती म्हणून याची नोंद करण्यात आली होती.
या पक्ष्याला असलेला धोका अद्याप कायम आहे. बैकाल टील स्वत:च्या संख्येत वृद्धी आणि स्वत:च्या घरट्यांच्या बहालीसोबत सुस्थितीत असल्याचे संकेत देत आहे. हे दृश्य मणिपूरमध्ये दुर्लक्ष पक्षी प्रजातींच्या संरक्षण प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचे उद्गार डब्ल्यूईएमचे सचिव एलांगबम प्रेमजीत यांनी काढले आहेत.