For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियन हल्ल्याने युक्रेनमध्ये हाहाकार

06:48 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियन हल्ल्याने युक्रेनमध्ये हाहाकार
Advertisement

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा : 8 ठार, 50 हून अधिक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था

कीव

Advertisement

रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा एकदा विनाशकारी वळण घेतले आहे. 30 जुलैच्या रात्री उशिरा, रशियन सैन्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोनच्या साहाय्याने युक्रेनच्या अनेक भागांवर मोठा हल्ला चढवला. यात किमान 8 जण ठार आणि 50 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यांची तीव्रता इतकी गंभीर होती की त्याचे पडसाद शेजारील आणि नाटो सदस्य असलेल्या पोलंडपर्यंत पोहोचले. रशियन क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सहा सदस्य ठार झाले. या हल्ल्यात इतर नऊ जण जखमी झाले, तर पाच जण अद्याप ढिगाऱ्याखाली बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.