महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियाने सोडलेल्या पत्रकाराचे स्वागत

06:12 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतली व्यक्तीश: भेट, अमेरिका-रशियात कैद्यांची अदलाबदल

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

पहिल्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिका आणि रशिया यांच्यात कैद्यांची आदलाबदल करण्यात आली आहे. याअंतर्गत रशियाने अमेरिकेचे पत्रकार इव्हान गेरशोविच यांची सुटका गुरुवारी केली होती. अमेरिकेनेही तिच्या ताब्यात असणाऱ्या काही रशियन कैद्यांची सुटका केली होती. पत्रकार गेरशोविच अमेरिकेत पोहचले असून त्यांचे तेथे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेन बायडेन यांनी त्यांची व्यक्तीश: भेट घेऊन क्षेमकुशल विचारले.

रशियाने गेरशोविच यांच्यासमवेत आणखी दोन अमेरिकन कैद्यांनाही मुक्त केले आहे. त्यांना घेऊन येणारे विमान अमेरिकेत पोहचल्यानंतर या कैद्यांच्या कुटुंबियांची त्यांच्याशी भेट घडविण्यात आली आहे. मेरिलँड येथे अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस हे नेते स्वागताला उपस्थित होते.

आणखी दोघांची सुटका

रशियाने गेरशोविच यांच्यासमावेत अमेरिकेचे माजी नौसैनिक पॉल व्हेलान आणि आल्सू कुर्माशेव्हा यांचीही सुटका केली होती. रशियाने त्यांना त्यांचा कोणताही गुन्हा नसताना चुकीच्या पद्धतीने कारागृहात डांबले होते. आता अमेरिकेच्या प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका आनंदात आहे, असे भावपूर्ण उद्गार बायडेन यांनी काढले आहेत.

अमेरिकेकडून चर्चा

अमेरिकेचे नागरीक असणाऱ्यांना रशिया आणि जर्मनीत काही कारणांमुळे कारागृहात डांबण्यात आले होते. त्यांच्यावर अमेरिकेसाठी हेरगिरी करण्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. अमेरिकेच्या पुढाकाराने त्यांच्या सुटकेच्या संदर्भात रशिया आणि जर्मनीही चर्चा करण्यात येत होती. बराच काळ रशियाने अमेरिकेच्या  मागणीला दाद दिली नव्हती. तथापि, गुरुवारी या प्रयत्नांना यश आले.

अटक का करण्यात आली...

गेरशोविच यांना गेल्यावर्षी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तथापि, त्यांनी आणि अमेरिकेने हा आरोप स्पष्टपणे नाकारला होता. रशियाने त्यांच्या विरोधात अभियोग चालविला होता आणि त्यांना 16 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. व्हेलान हे अमेरिकेचे माजी नौसैनिक आहेत. त्यांनाही हेरगिरीच्या आरोपावरुन 16 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. कुर्माशेव्हा या एका रेडिओ चॅनेलच्या संपादिका होत्या. त्या मूळच्या रशियन आहेत. त्या गेल्यावर्षी मे महिन्यात आपल्या आईला भेटण्यासाठी रशियात गेल्या होत्या. त्यांनाही अटक करण्यात आली होती. आता या सर्वांची सुटका झाली आहे.

Advertisement
Next Article