For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशिया-युक्रेन शांतता करार 90 टक्के पूर्ण

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशिया युक्रेन शांतता करार 90 टक्के पूर्ण
Advertisement

नववर्षारंभी झेलेन्स्की यांचा दावा : पुतीन यांचा सावध पवित्रा

Advertisement

वृत्तसंस्था/कीव

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या नवीन वर्षाच्या संदेशात रशियासोबतचे युद्ध संपवण्याचा धाडसी दावा केला. रशिया-युक्रेन शांतता करार 90 टक्के पूर्ण झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. आता कराराचा फक्त शेवटचा 10 टक्के भाग शिल्लक आहे. या करारामुळे युक्रेन आणि युरोपचे भविष्य निश्चित होऊन लाखो लोकांचे जीव वाचतील, असेही ते पुढे म्हणाले. याचवेळी झेलेन्स्की यांनी रशियाच्या आक्रमकतेविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली.

Advertisement

दुसरीकडे, पुतीन यांनी त्यांच्या नवीन वर्षाच्या संदेशात आपला देश या युद्धात विजयाकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात रशियासोबतचे युद्ध संपवण्याचा शांतता करार 90 टक्के तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले  युक्रेनला कोणत्याही किंमतीत शांतता हवी आहे. आम्हाला युद्धाचा अंत हवा आहे, पण युक्रेनचा अंत नाही. आम्ही रशियाच्या ‘चुकीच्या आणि हास्यास्पद अटी स्वीकारणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे.

डोनबास प्रदेशासंबंधी वाद

पूर्व डोनबास प्रदेशातून युक्रेनियन सैन्य मागे घेतल्याने सर्वकाही संपेल, असे झेलेन्स्की म्हणाले. रशियाचा शांतता करार या प्रदेशावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. रशिया सध्या डोनेस्तकचा 75 टक्के आणि शेजारच्या लुहान्स्कचा 99 टक्के भाग नियंत्रित करतो. डोनेस्तक आणि लुहान्स्क हे दोन प्रदेश एकत्रितपणे डोनबास म्हणून ओळखले जातात. हा प्रदेश रशिया आणि युक्रेनमधील तणावाचे एक कारण असून वाटाघाटींमध्ये तो एक मोठा अडथळा आहे. डोनबासवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या आपल्या ध्येयाशी रशिया तडजोड करण्यास तयार नसल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे.

Advertisement
Tags :

.