For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशिया युक्रेनचा रशियावर हल्ला, 21 ठार

06:26 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशिया  युक्रेनचा रशियावर हल्ला  21 ठार
Advertisement

क्लस्टर बॉम्बचा वापर झाल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियात युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये 21 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 111 जण जखमी झाले आहेत. युक्रेनने हे हल्ले क्लस्टर बॉम्बद्वारे केल्याचा आरोप रशियाने केला आहे. मृतांमध्ये 3 मुलांचा देखील समावेश आहे. हा हल्ला रशियाच्या बेलगोरेद शहरावर झाला असून ते युक्रेनच्या सीमेपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि युक्रेनच्या खारकीव्ह, लुहान्स्क, सूमी भागांना लागून आहे.

Advertisement

युद्ध सुरू झाल्यापासुन रशियाने शुक्रवारी कीव्हवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला होता. रशियाने 120 क्षेपणास्त्रs डागली होती आणि यात युक्रेनच्या 41 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनने शनिवारी रशियावर हल्ला केला आहे.

हल्ल्याचा सूड उगविणार

शनिवारी झालेल्या हल्ल्याचा आम्ही सूड उगविणार असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाने युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला दहशतवादी हल्ला ठरविले आहे. तसेच सुरक्षा परिषदेत यासंबंधी चर्चा करण्यासाठी रशियाने बैठक बोलाविली आहे. युक्रेनने पूर्वनियोजित कटाच्या अंतर्गत नागरिकांना लक्ष्य केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाने शनिवारी युक्रेनचे 32 ड्रोन नष्ट केले होते. हे ड्रोन रशियाच्या मॉस्को, ब्राइंस्क, ओरिओल आणि कुर्स्क भागाच्या दिशेने जात होते. बेलगोरदे शहराच्या दिशेने डागण्यात आलेले 13 युक्रेनियन रॉकेट नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे.

युद्ध सुरू असेपर्यंत जीवितहानीचा धोका

रशियाचा हुकुमशहा जोपर्यंत युद्ध सुरू ठेवणार तोपर्यंत लोक मृत्युमुखी पडत राहतील असे संयुक्त राष्ट्रसंघातील युक्रेनचे प्रतिनिधी सेरही द्वोरनिक यांनी म्हटले आहे. रशिया  21 नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवू पाहत असल्यास तर त्याने राष्ट्रपती पुतीन यांचेच नाव घ्यावे. रयिशात युक्रेनचा कुठलाच सैनिक नाही, परंतु युक्रेनमध्ये रशियाचे हजारो सैनिक आहेत असे वक्तव्य ब्रिटनचे मुत्सद्दी थॉमस फिप्स यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.