For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण-इस्रायल संघर्षातच रशियाची अमेरिकेला धमकी

06:30 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराण इस्रायल संघर्षातच रशियाची अमेरिकेला धमकी
Advertisement

इस्रायलला पाठिंबा दिल्यास शांत बसणार नसल्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

इस्रायल आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता या देशांना पाठबळ देण्यासाठी त्यांचे समर्थक देश पुढे सरसावले आहेत. गेल्या दोन दिवसात इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सातत्याने हल्ले केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावात अमेरिका आणि रशियानेही उडी घेतली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला इशारा देताना या तणावाच्या काळात जर अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असेल तर रशिया शांत बसणार नाही, उघडपणे इराणला पाठिंबा देईल, अशी धमकीच रशियाने दिली आहे.

Advertisement

रशियाने यापूर्वी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. याचदरम्यान रविवारी इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर यूएस नॅशनल सिक्मयुरिटी कौन्सिलचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स कोऑर्डिनेटर जॉन किर्बी यांनी अमेरिकेच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले. तसेच इराणने केलेला हल्ला परतवून लावण्यात अमेरिकेने इस्रायलला मदत केली होती.

इराणने शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसह इस्रायलवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. हे हल्ले प्रामुख्याने जेऊसलेम, दक्षिणेकडील नेगेव वाळवंट आणि मृत समुद्र, उत्तरेकडील इस्रायलच्या ताब्यातील गोलान हाईट्स, तसेच व्याप्त वेस्ट बँक या भागात करण्यात आले. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मात्र, आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने काही क्षेपणास्त्रे रोखल्याचेही स्पष्ट केले.

लॉन्च केलेल्या सुमारे 400-500 ड्रोनपैकी सुमारे 100 ड्रोन अमेरिका, जॉर्डन आणि ब्रिटिश सैन्यासह सहयोगी देशांनी इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी रोखली होती. क्षेपणास्त्राचे काही भाग उत्तर इस्रायलमधील उम्म अल-फहम या अरब शहराजवळ पडले असले तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. एप्रिल महिन्याच्या सुऊवातीला सीरियातील दमास्कस येथील इराणी कॉन्सुलर इमारतीत सात इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे.

Advertisement
Tags :

.