For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाकडून गुप्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

06:21 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियाकडून गुप्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
Advertisement

अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम : हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची रेजिमेंटही तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियाने शुक्रवारी एका टॉप सिव्रेट इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या क्षेपणास्त्राच्या चाचणीला दुजोरा दिला आहे. या क्षेपणास्त्रामुळे रशियाची सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement

इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे एक घन इंधन क्षेपणास्त्र असून ते थर्मो-न्यूक्लियर वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. ते जमिनीवर कोणत्याही ठिकाणी किंवा चालत्या वाहनावर देखील तैनात केले जाऊ शकते. मात्र, सध्यातरी त्याची क्षमता आणि वैशिष्ट्यांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रशियाची नवीन पिढीतील अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करू शकतात. ते कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीवर हल्ला करण्यास आणि भेदण्यास सक्षम आहे. सध्या कोणत्याही देशाकडे हायपरसॉनिक शस्त्रे नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे मत आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यापूर्वी रशियाने हायपरसॉनिक आण्विक क्षेपणास्त्रांची पहिली रेजिमेंट तैनात केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना याबाबत माहिती दिली. मात्र रशियाने हे क्षेपणास्त्र कोठे तैनात केले आहे याची माहिती समोर आलेली नाही. या प्रणालीचे नाव अव्हानगार्ड असे आहे. रशिया सध्या आरएस-24 यार्स क्षेपणास्त्रे वापरतो. रशियन भाषेत ‘यार्स’ या शब्दाचा अर्थ ‘अण्वस्त्र हल्ला रोखण्यासाठीचे रॉकेट’ असा होतो.

Advertisement
Tags :

.