For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युक्रेनच्या भागात रशियाकडून अण्वस्त्रांचे परीक्षण

06:00 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
युक्रेनच्या भागात रशियाकडून अण्वस्त्रांचे परीक्षण
Advertisement

पुतीन यांनी दिला होता आदेश : इस्कंदर, किंझल क्षेपणास्त्र  परीक्षणात सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याने इस्कंदर आणि किंझल क्षेपणास्त्रांसोबत टॅक्टिकल न्युक्लियर टेस्ट सुरू केली आहे. हे परीक्षण युक्रेनच्या दक्षिण सैन्य भागात होत असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. हा भूभाग अत्यंत मोठा असल्याने परीक्षण नेमके कोठे सुरू आहे हे स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

रशियाने युद्धाच्या प्रारंभीच्या काळात या भूभागावर कब्जा केला होता. रशियाच्या अण्वस्त्र परीक्षणात बेलारुस देखील सामील होणार असल्याचे मानले जात आहे. रशियाने बेलारुसमध्ये टॅक्टिकल न्युक्लियर वेपन तैनात करण्याची घोषणा मागील वर्षी केली होती. रशिया या परीक्षणाच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देऊ पाहतोय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी मागील महिन्यातच स्वत:च्या सैन्याला अण्वस्त्र हाताळण्याचा सराव करण्याचा आदेश दिला होता. यात नौदल आणि युक्रेनच्या सीमेनजीक तैनात सैनिकांना सामील होण्यास सांगण्यात आले होते.

नाटो आणि पाश्चिमात्य देशांनी युक्रेनच्या मदतीसाठी सैन्य पाठविण्याचा विचार चालविला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून हे अण्वस्त्रांचे परीक्षण केले जात आहे. युक्रेनने मदत मागितली तर आम्ही आमच्या सैनिकांना तेथे पाठवू शकतो असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले होते. युक्रेन रशियावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश शस्त्रास्त्रांचा वापर करू शकतो असे ब्रिटनचे विदेशमंत्री डेव्हिड कॅमेरून यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने युक्रेनला एप्रिलमध्ये एटीएसीएमएस क्षेपणास्त्रs पुरविली होती. या क्षेपणास्त्रांची मारक कक्षा 300 किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच या क्षेपणास्त्रांचा वापर युक्रेनने केला तर रशियात 300 किलोमीटर आतपर्यंत हल्ला होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.