कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियाकडून आर-37एम क्षेपणास्त्राची ऑफर

06:04 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली, लढाऊ विमान क्षणार्धात होणार नष्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असताना रशियाने भारताला आर-37एम क्षेपणास्त्राची ऑफर दिली आहे. ही ऑफर सू-30एमकेआय लढाऊ विमानांच्या ताफ्याला या क्षेपणास्त्रांनी युक्त करण्यासाठी आहे. आर-37एम एक हायपरसोनिक दीर्घ पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

एए-13 एक्सहेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या आर-37एमचा मारक पल्ला 300-400 किलोमीटर इतका आहे. तर याचा कमाल वेग मॅक 6 इतका आहे. या अत्याधिक वेगामुळेच हे जगातील सर्वात घातक बियॉन्ड-व्हिज्युअल-रेंज (बीव्हीआर) क्षेपणास्त्रांपैकी एक ठरले आहे. हे आकाशात लक्ष्याला ट्रॅक न करता त्याच्यावर हल्ला करण्याची क्षमता बाळगून आहे. पाकिस्तान आणि चीनसोबत क्षेत्रीय तणावादरम्यान भारत स्वत:चे हवाईसामर्थ्य वाढवू इच्छित असल्याने ही ऑफर महत्त्वपूर्ण ठरत आहे.

आर-37एम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

या क्षेपणास्त्राला रशियाच्या विम्पेल डिझाइन ब्युरोने विकसित केले असून एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, टँकर विमान, लढाऊ विमानांसारख्या हायव्हॅल्यू एअर टार्गेट्सना निष्प्रभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

जेटिसनबल रॉकेट बूस्टर क्षेपणास्त्राला 300-400 किमीची विस्तारित कक्षा प्राप्त करण्यास सक्षम करतो. भारताच्या वर्तमान आर-77 क्षेपणास्त्रांपेक्षा ही कक्षा अधिक आहे, आर-77 ची मारककक्षा जवळपास 100 किमी आहे.

क्षेपणास्त्राचा मॅक 6 (जवळपास 7400 किमी/प्रतितास)पर्यंतचा हायपरसोनिक वेग लक्ष्यांवर वेगाने हल्ला करते, ज्यामुळे शत्रूला वाचण्याची संधीच मिळत नाही.

या क्षेपणास्त्राचे वजन जवळपास 510 किलो असून सोफिस्टिकेडेड गायडेन्स सिस्टीमने युक्त असून तो याला मिड-कोर्ट अपडेट्स, अॅक्टिव्ह रडार होमिंग आणि टर्मिनल फेससाठी नेव्हिगेशनशी जोडतो.

आर-37 एम अनेक विमानांमध्ये जोडले जाऊ शकते, ज्यात एसयू-30, एसयू-35, एसयू-57, मिग-31बीएम आणि मिग-35 सामील आहे. रशियाने एसयू-30 साठी ऑफर केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article