कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियाकडून 5 व्या पिढीच्या एसयू-57ईची ऑफर

06:19 AM Jun 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

भारत आणि पाकिस्तानदरम्यान अलिकडेच मोठा तणाव दिसून आला आहे. या स्थितीत पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाची चर्चा सातत्याने होत आहे. याच क्रमात रशियाने भारताला पुन्हा एकदा पाचव्या पिढीच्या एसयू-57ई लढाऊ विमानांची ऑफर दिली आहे. या प्रस्तावात भारतीय सिस्टीमच्या स्थानिकीकरण आणि एकीकरणावर जोर देण्यात आला आहे.

Advertisement

एसयु-57ईमध्ये भारतात सुपर-30 जेटसाठी नियोजित प्रमुख तंत्रज्ञानं सामील असतील, ज्यात जीएएन-आधारित एईएसए रडार आणि भारताकडुन विकसित मिशन कॉम्प्युटर सामील आहे. या पावलाचा उद्देश सुपर-30 कार्यक्रमासोबत समानता सुनिश्चित करणे आहे, यामुळे भारतीय वायुदलाला स्वदेशी स्वरुपात विकसित आकाशातून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रास्त्र प्रणालींशी एसयू-57ईला युक्त करण्यास सक्षम करता येईल.

रशियाच्या ऑफरमुळे लाभ

एसयू-57ईची ऑफर सुपर-30जेटच्या तंत्रज्ञानाच्या संरचनेवर आधारित आहे, जे वायुदलाच्या एसयु-30एमकेआय ताफ्याचे अपग्रेडेड वर्जन आहे. गॅलियम नायट्राइड आधारित अॅक्टिव इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे रडार आणि भारतीय मिशन कॉम्प्युटरला सामील केल्याने एसयू-57ईची क्षमता वाढेल, तसेच सुपर-30 जेटसोबत समानता सुनिश्चित करत देखभाल आणि ऑपरेशनल लॉजिस्टिकला सुव्यवस्थित करता येणार आहे.

या एकीकरणामुळे एसयू-57ईला भारतीय बनावटच्या शस्त्रास्त्र व्हिज्युअल रेंजच्या बियाँड एअर टू एअर मिसाइल आणि एअर टू सरफेस मिसाइल वाहून नेण्यास मदत मिळेल. यामुळे विदेशी पुरवठादारांवरील निर्भरता कमी होईल आणि मेक इन इंडिया पुढाकारासोबत ताळमेळ देखील राखता येणार आहे.

भारत स्वत:च्या आवश्यकतेनुसार एसयू-57ई मध्ये बदल करू शकतो असे रशियाचे सांगणे आहे. सुखोई लढाऊ विमा निर्माण करणाऱ्या कंपन्या याची निर्मिती करू शकतात. रशिया याचबरोबर याचा सोर्स कोड आणि तंत्रज्ञान देखील पुरविण्यास तयार आहे.

एसयु-57ईची वैशिष्ट्ये

पाचव्या पिढीचे हे लढाऊ विमान स्टील्थ डिझाइनयुक्त असुन यामुळे आधुनिक रडार याला डिटेक्ट करू शकत नाही. या लढाऊ विमानात आर-37एम क्षेपणास्त्रs जोडण्यात येणार असून ती 400 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. हे विमान राफेलपेक्षाही घातक लढाऊ विमान असल्याचे रशियाचे सांगणे आहे.

 

Advertisement
Next Article