रशियाने नष्ट केले एफ-16
पाकिस्तानची उडाली झोप
वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनच्या युद्धात रशियाच्या सैन्याला मोठे यश मिळाले आहे. युक्रेनकडून संचालिन अमेरिकन एफ-16 लढाऊ विमान पाडल्याची घोषणा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे. अशाप्रकारची घोषणा रशियाने पहिल्यांदाच केली आहे. रशियाने स्वत:च्या सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या आर-37 क्षेपणास्त्राच्या मदतीने एफ-16 नष्ट केल्याचे प्रारंभिक तपासात समोर आले आहे. एफ-16 विमानाला अनेक दशकांपासून अमेरिकेच्या वायुदलाची शान समजले जाते आणि रशियाने ते पाडविण्यात आल्याने अमेरिकेला मोठा झटका बसला आहे.
तर रशियाच्या या यशामुळे पाकिस्तानची देखील झोप उडणार आहे. युक्रेन युद्धात आतापर्यंत दोन एफ-16 विमाने नष्ट झाली आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर एफ-16 चा वैमानिक इजेक्ट करण्यास यशस्वी ठरल्याने त्याचा जीव वाचला असल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
एस-400, आर-37 एम शक्तिशाली
अमेरिका किंवा पाश्चिमात्य लढाऊ विमानांना रशियाच्या क्षेपणास्त्रांनी नष्ट करणे शक्य असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. युक्रेनच्या सैन्याला नाटो देशांकडून 20 एफ-16 लढाऊ विमाने मिळाली आहेत. या विमानांमुळे युक्रेनच्या वायुदलाची शक्ती अनेकपटीने वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु युक्रेन युद्धात अनेक स्तरांवर सक्रीय असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा आणि आकाशात नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्रांना या विमानाला सामोरे जावे लागत आहे. रशियाची एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या विमानांना नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे. या यंत्रणेत अत्यंत शक्तिशाली रडार असल्याने युक्रेनच्या वायुदलाला एफ-16 ची उ•ाणे करविणे अवघड ठरले आहे. तर आर-37 हे क्षेपणास्त्र 200 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लढाऊ विमानांना नष्ट करण्याची क्षमता राखून आहे. हे क्षेपणास्त्र मॅक 6 च्या वेगाने हल्ला करते आणि याला खासकरून मिग-31बीएम आणि एसयू-35एस लढाऊ विमानात जोडण्यात आले आहे. रशियन लढाऊ विमाने युक्रेनच्या विमानाला दूर अंतरावरूनच लक्ष्य करत आहेत.
पाकिस्तानची चिंता वाढणार
रशियाच्या या यशामुळे पाकिस्तानी सैन्याचीही झोप उडाली आहे. पाकिस्तानकडे समारे 85 एफ-16 लढाऊ विमाने आहेत. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात एफ-16 लढाऊ विमानांचा वापर केला होता. भारताने रशियाकडून 5 एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्या आहेत. भारताने यातील एका यंत्रणेला चंदीगडच्या आसपास तर दुसरी यंत्रणा गुजरातनजीक तैनात केली आहे. ही दोन्ही ठिकाणं पाकिस्तान सीमेपासून नजीक आहेत. एस-400 स्वत:च्या कक्षेद्वारे पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमानांची उ•ाण देखील रोखू शकतो. याचबरोबर भारत आता रशियासोबत मिळून आर-37 क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहे. या क्षेपणास्त्राला राफेलपासून सुखोई विमानातून डागता येणार आहे.