नागरी वस्तीतील शस्त्रसाठ्यावर रशियाचा हल्ला
युक्रेनमध्ये दारूगोळा, भूसुरुंग, ड्रोन्सचा स्फोट : 37 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हनजीक एका शस्त्रास्त्र डेपोवर ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर डेपोमध्ये ठेवण्यात आलेले तोफगोळे, भूसुरुंग आणि ड्रोन्सचा स्फोट झाला आहे. स्फोटांमुळे आसपासची घरे आणि इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कमीतकमी 37 जणांचा मृत्यू झाला असून 130 घरांना नुकसान पोहोचले आहे.
या स्फोटांमध्ये 42 जण जखमी झाले आहेत. शस्त्रास्त्रांचा साठा नागरी वस्तीच्या इतक्या नजीक असणे चुकीचे होते. नागरी इमारतींनजीक शस्त्रास्त्रs आणि स्फोटके ठेवण्याची अनुमती कायदेशीर होती की नाही याची चौकशी केली जातेय, असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
रशियाच्या सैन्याने कीव्हच्या पश्चिम दिशेला असलेल्या मिला गावातील शस्त्रास्त्रसाठ्याला लक्ष्य केले आहे. तेथे एफपी-1 आणि एफपी-2 दीर्घ पल्ल्यापर्यंत उ•ाण करू शकणाऱ्या ड्रोन्सचे सुटे भाग आणि त्यांना लाँच करणारे बुस्टर ठेवण्यात आले होते, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला.
5 वर्षांनंतरही चुकांची पुनरावृत्ती
मागील महिन्यात विश्नेवे येथेही अशीच घटना घडली होती. तेथे झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 280 हून अधिक घरांना नुकसान पोहोचले होते. एका सरकारी कंपनीने नागरी इमारतींनजीक स्फोटक सामग्री ठेवण्याशी निगडित नियमांचे पालन केले नव्हते असे चौकशीतून समोर आले होते. विश्नेवेच्या घटनेतून धडा मिळाला तरीही आम्ही पावले उचलली नक्हती. युद्धाला 5 वर्षे होऊनही त्याच चुकांची पुनरावृत्ती करणे गुन्हेगारी निष्काळजीपणा असल्याचे उद्गार युक्रेनचे पंतप्रधान कोरेत्स्की यांनी काढले. युक्रेनकडे पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची मोठी कमतरता निर्माण झाली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम युक्रेनच्या प्रमुख हवाई सुरक्षा प्रणालीत पॅट्रियट सामील आहे.